TRENDING:

PMC Election : पुण्यात सर्वच पक्षाचे शहराध्यक्ष महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात, प्रतिष्ठा पणाला! पाहा कोण कोण?

Last Updated:
Pune PMC Election (अभिजित पोटे, प्रतिनिधी) :भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे सर्वजण शहराध्यक्ष पदाचे दावेदार आहेत.
advertisement
1/6
PMC Election : पुण्यात सर्व पक्षाचे शहराध्यक्ष महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात
पुणे शहर महानगरपालिका निवडणुकीत जवळपास सगळ्याच पक्षाचे शहराध्यक्ष महानगरपालिका निवडणूक लढवत आहेत. शहरात पाचही मुख्य पक्षाचे शहराध्यक्ष महापालिका निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
advertisement
2/6
पुण्यात प्रदेश भाजपकडून माजी सभागृहनेते धीरज घाटे यांची फेरनिवड करण्यात आली होती. अशातच धीरज घाटे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
advertisement
3/6
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पुणे स्टेशन-जय जवान नगर प्रभाग क्रमांक 13 चे कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांना तिकीट देण्यात आलंय.
advertisement
4/6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यंदा प्रभाग क्रमांक 36 (अ) मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खुद्द दादांनी त्यांच्यासाठी रोड शो आयोजित केलाय.
advertisement
5/6
ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांना देखील तिकीट देण्यात आलं असून ठाकरेंनी आपले जुने शिलेदार पुन्हा मैदानात उतरवले आहेत.
advertisement
6/6
मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना देखील तिकीट मिळालं असून साईनाथ बाबर यांचा विधानसभेला सपाटून पराभव झाला होता. आता त्यांनी पुन्हा नशीब आजमावलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
PMC Election : पुण्यात सर्वच पक्षाचे शहराध्यक्ष महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात, प्रतिष्ठा पणाला! पाहा कोण कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल