TRENDING:

वालाच्या शेंगाची भाजी! पौष महिन्यात बनवा विदर्भ स्पेशल थाळी, वालाच्या शेंगा आणि मूगाची खिचडी, रेसिपीचा संपूर्ण Video

अमरावती : विदर्भ हा झणझणीत पदार्थासाठी प्रसिद्ध आहे. वर्षभर सुद्धा विदर्भात प्रत्येक सणावाराला काही तरी विशेष पदार्थ किंवा एखादी विशेष थाळी बनवली जाते. सध्या पौष महिना सुरू आहे. पौष महिन्यात विदर्भात आवर्जून बनवली जाणारी थाळी म्हणजे वाल्याच्या शेंगाची भाजी, मूगाची खिचडी आणि भाकरी किंवा पोळी. हिवाळ्यामध्ये वालाच्या शेंगा खूप पौष्टीक असतात. त्यामुळे डॉक्टर सुद्धा त्या खाण्याचा सल्ला देतात. विदर्भात पौष रविवारला मूगाची खिचडी आणि वालाच्या शेंगाची भाजी हाच बेत बनवला जातो. तुम्ही एरवी सुद्धा बनवू शकता. वालाच्या शेंगाची भाजी कशी बनवायची? याची रेसिपी आपल्याला अमरावतीमधील रसिका शेळके यांनी सांगितली आहे.

Last Updated: Jan 09, 2026, 15:29 IST
Advertisement

ढाब्यावरील बॉम्बे बॅनर फाडला, मनसेचं पुन्हा खळ्ळखट्ट्याक, VIDEO

मराठीसाठी मनसे पुन्हा आक्रमक होताना दिसते आहे. मुंबई- नाशिक मार्गावर एका धाब्याचे नाव बॉम्बे असे ठेवण्यात आले होते. तो बॅनर मनसे कार्यकर्त्यांनी फाडला आहे. त्यांनी हा बॅनर बदलून मुंबई असे करण्याचा दम कार्यकर्त्यांनी दिला आहे. \r\n

Last Updated: Jan 09, 2026, 21:39 IST

Political Report : मुंबईकर vs नागपूरकर, राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये कलगीतुरा

आतले विरुद्ध बाहेरचे असा वाद ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री यांच्यात पेटलेला दिसत आहे. तेव्हा राज ठाकरें म्हणाले, बाहेरच्या राज्यकर्त्यांना मुंबईचे प्रश्न कधीच समजू शकणार नाहीत.यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

Last Updated: Jan 09, 2026, 21:24 IST
Advertisement

उद्धव ठाकरेंच्या भाषणात पेंग्विनचा उल्लेख, भाजपवर केली बोचरी टीका, VIDEO

नाशिकमधून उद्धव ठाकरेंचं भाषण झाले. त्यात ते म्हणाले, "मुंबईमध्ये जिजामाता उद्यानात १० वर्षापूर्वी पेंग्विन आणले.आमच्यावर टीका केली. पेंग्विन आणले. हो पेंग्विन आम्ही आणले.ते पेंग्विन बघायला लोकं तिकीट काढून गर्दी करतायत.त्यांच्या सभेला पैसे देऊन माणसं आणावी लागतात. म्हणजे पेंग्विन एवढीही किंमत त्यांची नाहीये. पैसे घेऊनही त्यांच्या सभेला येत नाहीयेत. ही अवस्था आहे त्यांची."

Last Updated: Jan 09, 2026, 21:06 IST

'भाजपनं अकोटमध्ये एमआयएम सोबत युती केली..तेव्हा काय सुटलं नव्हतं..'उद्धव ठाकरेंचा घणाघात, VIDEO

नाशिकमधून उद्धव ठाकरेंचं भाषण चालू आहे. त्यात ते म्हणाले," भाजपने अकोटमध्ये एमआयएम सोबत युती केली.तेव्हा काय सुटलं नव्हतं तुमचं की मुळात सुटायला काही नव्हतंच." असा घणाघात विरोधकांवर केला आहे.

Last Updated: Jan 09, 2026, 20:42 IST
Advertisement

कल्याण डोंबिवलीतील उमेदवारांना १५ कोटींची ऑफर- राज ठाकरे , VIDEO

नाशिकमधून राज ठाकरेंचं भाषण चालू आहे. त्यात त्यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे. त्यात ते म्हणाले, "कल्याण डोंबिवलीतील उमेदवारांना १५ कोटींची ऑफर दिली गेली होती."

Last Updated: Jan 09, 2026, 20:19 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/अमरावती/
वाल्याच्या शेंगाची भाजी! पौष महिन्यात बनवा विदर्भ स्पेशल थाळी, वालाच्या शेंगा आणि मूगाची खिचडी, रेसिपीचा संपूर्ण Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल