TRENDING:

Pune Rain Update: विजा कडकडणार, मुसळधार पाऊस कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना हायअलर्ट

Last Updated:
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला हवामानात मोठ्या प्रमाणात बदल जाणवत आहेत. अनेक ठिकाणी विजासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना हायअलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5
विजा कडकडणार, मुसळधार पाऊस कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना हायअलर्ट
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला हवामानात मोठ्या प्रमाणात बदल जाणवत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी विजासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना हायअलर्ट देण्यात आला आहे. 1 सप्टेंबरचा हवामानाचा अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
पुण्यातील घाट परिसरात आज कडाक्याच्या विजासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित पुण्यात कोणताही विशेष अलर्ट नाही येथे हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात यलो अलर्ट देण्यात आला आहे. याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित सातारा जिल्ह्यात कोणताही विशेष अलर्ट देण्यात आला नाही.
advertisement
4/5
कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट परिसरात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासांसाठी हा अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
5/5
सप्टेंबरच्या सुरुवातीला अनेक जिल्ह्यांना हायअलर्ट देण्यात आला आहे. मात्र, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये कोणताही विशेष अलर्ट नाही. येथे हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही काळ हीच परिस्थिती राहणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Rain Update: विजा कडकडणार, मुसळधार पाऊस कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांना हायअलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल