पुणेकरांनी आकाशात असं काय पाहिलं? लोकांनी थांबून काढले फोटो
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
दोन इंद्रधनुष्य एकाच वेळी दिसल्याने पुणेकरांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. सोशल मीडियावरही काही मिनिटांत या दृश्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले.
advertisement
1/5

पुणे शहरात मागील काही दिवसांपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे हवामानात बदल जाणवत आहे. सायंकाळी पुणेकरांना आकाशात निसर्गाचं अप्रतिम दृश्य पाहायला मिळालं, दुहेरी इंद्रधनुष्य!
advertisement
2/5
या अनोख्या दृश्याने नागरिक मंत्रमुग्ध झाले आणि रस्त्यावर, पुलांवर, तसेच मोकळ्या मैदानांवर थांबून या नयनरम्य क्षणांचे फोटो टिपताना दिसले. सायंकाळच्या सुमारास अचानक पावसाच्या सरी कोसळल्यानंतर आकाशात सूर्यकिरण झळकले आणि क्षणार्धात रंगीबेरंगी इंद्रधनुष्य दिसू लागले.
advertisement
3/5
यावेळी एक नव्हे तर दोन इंद्रधनुष्य एकाच वेळी दिसल्याने पुणेकरांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. सोशल मीडियावरही काही मिनिटांत या दृश्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. पुण्यातील एस. एम. जोशी पूल परिसर, शनिवारवाडा, सेनापती बापट रोड आणि खडकवासला भागात अनेकांनी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले.
advertisement
4/5
काहींनी वाहनं थांबवून या सुंदर क्षणांचा आनंद घेतला, तर काहींनी आपल्या कुटुंबीयांसह आकाशाकडे नजर लावून निसर्गाची ही रंगीत भेट अनुभवली. पावसानंतर वातावरणातील सूक्ष्म थेंब सूर्यकिरणांचे अपवर्तन आणि परावर्तन करताना असे दुहेरी इंद्रधनुष्य तयार होतात.
advertisement
5/5
पुण्यात ऑक्टोबर महिन्यात अशी दृश्ये क्वचितच दिसतात, त्यामुळे हा प्रसंग अनेकांसाठी अविस्मरणीय ठरला. रस्त्यावरून जात असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपलेले क्षण सांगत होते, निसर्गाची प्रत्येक भेट मनाला आनंद देणारी असते. दुहेरी इंद्रधनुष्याने पुणेकरांच्या सायंकाळीचा क्षण खरोखरच रंगीबेरंगी बनवला.