TRENDING:

Cat Cafe In Pune: कोरियन बन्स अन् कॉफी, पुण्यात पहिल्यांदाच सुरू झालं कॅट कॅफे, तुम्ही दिलीये का भेट?

Last Updated:
प्राणीप्रेमींना आकर्षित करणाऱ्या या ठिकाणी 14 ते 15 देशी विदेशी जातींच्या मांजरींसोबत वेळ घालवण्याचा एक अनोखा अनुभव घेता येतो.
advertisement
1/7
कोरियन बन्स अन् कॉफी, पुण्यात पहिल्यांदाच सुरू झालं कॅट कॅफे, दिलीये का भेट?
पुण्यातील एफसी रोडवर एक आगळीवेगळी आणि नावीन्यपूर्ण संकल्पना पाहिला मिळते. नाइन लाईव्हज कॅट कॅफे, हा शहरातील पहिला आणि भारतातील तिसरां कॅट कॅफे आहे.
advertisement
2/7
प्राणीप्रेमींना आकर्षित करणाऱ्या या ठिकाणी 14 ते 15 देशी विदेशी जातींच्या मांजरींसोबत वेळ घालवण्याचा एक अनोखा अनुभव घेता येतो.
advertisement
3/7
जपानमध्ये सुरू झालेली कॅट कॅफे ही संकल्पना आता पुण्यातही पोहोचली आहे. सरिता काळे या जपानी भाषा शिकवतात.
advertisement
4/7
त्यांच्या मित्राने वेगळं काही कर असा सल्ला दिल्यानंतर त्यांनी जपान, सिंगापूर, मलेशिया इत्यादी देशांमधील कॅट कॅफेंची माहिती घेतली आणि त्यावर आधारित पुण्यात हा खास कॅफे सुरू केला.
advertisement
5/7
नाइन लाईव्हज कॅट कॅफेमध्ये ग्राहकांना एका तासासाठी मांजरींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते. येथे बेंगॉल, पर्शियन आणि इतर विदेशी जातींच्या मांजरी आहेत. यापैकी काही मांजरी कॅफेच्या स्वतःच्या कॅट फॅमिलीमधील आहेत, तर काही रस्त्यावर सोडून दिलेल्या मांजरी आहे.
advertisement
6/7
या मांजरींना केवळ बघण्यासाठीच नव्हे, तर त्यांच्या सोबत राहून सकारात्मक ऊर्जा व अनुभव घेण्यासाठीही अनेक लोक येथे येतात. मांजरी ऑरा क्लीन्सिंग करतात आणि त्यांच्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते, असं सरिता काळे यांनी सांगितलं.
advertisement
7/7
या कॅफेमध्ये स्वादिष्ट कोरियन बन्स, कॉफी आणि विविध गेम्सचा आनंदही ग्राहक घेऊ शकतात. पुणेकर या अनोख्या कल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत, आणि हळूहळू ही जागा प्राणीप्रेमींच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक बनत आहे. नाइन लाईव्हज कॅट कॅफे केवळ खाद्यपदार्थ आणि मनोरंजनासाठीच नाही, तर प्राणी आणि मानव यांच्यातील स्नेहसंबंध वाढवण्याचे एक सुंदर माध्यम ठरत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Cat Cafe In Pune: कोरियन बन्स अन् कॉफी, पुण्यात पहिल्यांदाच सुरू झालं कॅट कॅफे, तुम्ही दिलीये का भेट?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल