TRENDING:

Pune : पोरीनं मोहोळ जिंकलं! राजन पाटलांचा गड फोडणाऱ्या सिद्धी वस्त्रेंने घेतली अजितदादांची भेट

Last Updated:
Mohol Siddhi Vastre Met Ajit Pawar : मोहोळ नगरपरिषदेत शिवसेनेच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या अनुभवी उमेदवार शीतल क्षीरसागर यांचा 170 मतांनी पराभव करत नगराध्यक्षपद पटकावलं होतं.
advertisement
1/6
पोरीनं मोहोळ जिंकलं! राजन पाटलांचा गड फोडणाऱ्या सिद्धी वस्त्रेंने घेतली अजितदादा
मोहोळ नगरपरिषदेत शिवसेनेच्या 22 वर्षीय सिद्धी वस्त्रे नगराध्यक्षपदी विजयी झाली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाचा धक्का सहन करावा लागला. अशातच सिद्धी वस्त्रे यांनी अजित पवारांची पुण्यात भेट घेतली.
advertisement
2/6
मोहोळ नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली. अवघ्या 22 वर्षांच्या असलेल्या सिद्धी वस्त्रे यांनी अत्यंत कमी वयात हे पद मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय.
advertisement
3/6
या भेटीदरम्यान अजित पवार यांनी सिद्धी वस्त्रे यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी युती करत ही निवडणूक लढवली होती.
advertisement
4/6
मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यात अतिशय अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये सिद्धी वस्त्रे यांनी 170 मतांनी विजय संपादन करत बाजी मारली.
advertisement
5/6
या विशेष भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, शिवसेना नेते रमेश बारस्कर आणि उज्वला थिटे यांच्यासह अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
advertisement
6/6
एका तरुण मुलीने राजकारणात घेतलेली ही झेप सध्या सोलापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. यामुळे आता सोलापूरच्या राजकारणाला नव वळण येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune : पोरीनं मोहोळ जिंकलं! राजन पाटलांचा गड फोडणाऱ्या सिद्धी वस्त्रेंने घेतली अजितदादांची भेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल