TRENDING:

सोसायटीत मॅटर झालं अन् ज्याच्याकडे सांभाळायला दिली त्यानेच 8,00,00,000 रुपयांचं कांड केलं; समिती कोमात, पुण्यातील घटना PHOTOS

Last Updated:
पुण्यातील एकता को-ऑपरेटिव्ह नावाची एक सोसायटी आहे. या सोसासटीमध्ये नवीन 33 सदस्य आहे. ज्यांनी  2005 मध्ये शेअर्स खरेदी केले होते. पण, त्यानंतर या ३३ सदस्यांचा नव्याने वाद उद्भवला. (अभिजीत पोते, प्रतिनिधी)
advertisement
1/10
सोसायटीत मॅटर झालं अन् ज्याच्याकडे सांभाळायला दिली त्यानेच 8,00,00,000 चं कांड
पुणे आणि कल्याण- डोंबिवली परिसरात सोसायटीमधले वाद हे काही नवीन नाही. या ना त्या मुद्यावरून सोसायट्यांमध्ये वाद होतच राहतात. कधी कधी सोसायटीचे वाद हे इतकी विकोपाला जातात की, पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतात. पण, पुण्यातील एका सोसायटीचं प३करण थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोहोचलं. हे प्रकरण होतं, तब्बल 8 कोटी लाचेचं. इतक्या मोठ्या प्रमाणात लाच शासकीय काय खासगी क्षेत्रातही कुणी मागितली नसेल.
advertisement
2/10
त्याचं झालं असं की, पुण्यातील एकता को-ऑपरेटिव्ह नावाची एक सोसायटी आहे. या सोसासटीमध्ये नवीन 33 सदस्य आहे. ज्यांनी  2005 मध्ये शेअर्स खरेदी केले होते. पण, त्यानंतर या ३३ सदस्यांचा नव्याने वाद उद्भवला. हा वाद इतका विकोपाला गेला ही सोसायटी लिक्विडेशनमध्ये गेली होती. लिक्विडेशन म्हणजे, आता ही सहकारी सोसायटी आता कायदेशीररित्या बंद झाली किंवा समिती विसर्जित झाली होती.
advertisement
3/10
सोसायटी समिती विसर्जित झाल्यानंतर सोसायटीचं सगळं काम समितीकडून काढून घेतलं जातं आणि हे नियमाप्रमाणे  ते सरकार किंवा निबंधकांनी नियुक्त केलेल्या एका अधिकाऱ्याकडे ज्याला लिक्विडेटर म्हणतात, त्याच्याकडे सोपवलं होतं.  हा लिक्विडेटर सोसायटीची मालमत्ता ताब्यात घेतो, कर्ज फेडणे, सोसायटीचा रोजचा खर्च करण्याचे अधिकार त्याच्याकडे असतात.
advertisement
4/10
एकता को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सरकारी नियुक्त लिक्विडेटर विनोद माणिकराव देशमुख (वय 50) आणि पॅनल ऑडिटर भास्कर राजाराम पोल (वय 56) हे काम पाहत होते. पण, या दोन्ही भामट्यांनी मोठं कांड केलं.
advertisement
5/10
भास्कर पोल यांनी  3 कोटी शेअर प्रमाणपत्रांसाठी तर देशमुख यांनी आगामी भूखंड लिलावात तक्रारदाराच्या पसंतीच्या पक्षाला जमीन मिळावी म्हणून 5 कोटी लाचेची मागणी केली.
advertisement
6/10
इतक्या मोठ्या रक्कमेची मागणी केल्यामुळे तक्राराला मोठा धक्का बसला. तक्रारदाराने ACB कडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर तक्रारीची पडताळणी करून एसीबीच्या टीमने सापळा रचला.
advertisement
7/10
५ डिसेंबरच्या संध्याकाळी 6.55 वाजता स्वयं साक्षीदारांसमोर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सरकारी नियुक्त लिक्विडेटर विनोद माणिकराव देशमुख आणि पॅनल ऑडिटर भास्कर राजाराम पोल यांना तब्बल 8 कोटींची लाच मागितल्याच्या आरोपाखाली अटक केली.
advertisement
8/10
लिक्विडेटर विनोद माणिकराव देशमुख आणि पॅनल ऑडिटर भास्कर राजाराम पोल या भामट्यांनी  30 लाखांची आगाऊ रक्कम स्वीकारताना एसबीच्या टीमने रंगेहाथ पकडलं.
advertisement
9/10
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत केस नोंदवली असून वरिष्ठ अधिकारी सुपरिंटेंडेर शिरीष सरदेशपांडे, SP अजित पाटील आणि अ‍ॅड. SP अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
advertisement
10/10
एखाद्या सहकारी सोसायटीमध्ये घडलेला हा प्रकार समोर आल्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
सोसायटीत मॅटर झालं अन् ज्याच्याकडे सांभाळायला दिली त्यानेच 8,00,00,000 रुपयांचं कांड केलं; समिती कोमात, पुण्यातील घटना PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल