TRENDING:

Baramati Lok Sabha Election : बारामती लोकसभा निकालाआधीच उधळला होता गुलाल! आता थेट अभिनंदनाचे लावले बॅनर

Last Updated:
Baramati Lok Sabha Election : बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच कार्यकर्त्यांनी विजयाचे अभिनंदन करणारे बॅनर रस्त्याच्या कडेला लावले आहेत. (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी)
advertisement
1/5
बारामती लोकसभा निकालाआधीच उधळला होता गुलाल! आता थेट अभिनंदनाचे लावले बॅनर
देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. दोन्ही उमेदवारांकडून विजयाचा दावा केला जात आहे. यामध्ये शरद पवार गट एक पाऊल पुढं असल्याचं समोर आलंय.
advertisement
2/5
बारामती लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधाची पुणे सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावाच्या हद्दीत सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.
advertisement
3/5
शिवसेना ठाकरे गटाचे भोर तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी हे बॅनवर लावले आहेत. सुप्रिया सुळे यांची बारामती लोकसभा खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, गुलाल आपलाच.."कोण म्हणतोय येत नाय, आल्याशिवाय राहत नाय", अशा आशयाचा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला आहे.
advertisement
4/5
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा सामना होतोय, त्यामुळे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं आहे.
advertisement
5/5
त्यातच निकाला आधीच पुणे सातारा महामार्गावर सुप्रिया सुळे यांच्या अभिनंदनाचे फलक लागल्यानं, हे फलक रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Baramati Lok Sabha Election : बारामती लोकसभा निकालाआधीच उधळला होता गुलाल! आता थेट अभिनंदनाचे लावले बॅनर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल