TRENDING:

काहीसा ब्रेक, तरीही अलर्ट! पश्चिम महाराष्ट्रात आज काय आहे पावसाचा अंदाज?

Last Updated:
राज्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी देखील पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
1/7
काहीसा ब्रेक तरीही अलर्ट! पश्चिम महाराष्ट्रात आज काय आहे पावसाचा अंदाज?
राज्यात सप्टेंबरच्या मध्यात धुमाकूळ घालणाऱ्या शेवटी मात्र काहीसा ब्रेक घेतला आहे. तरीही काही ठिकाणी आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/7
पुणे शहरात आज वातावरण सामान्यत ढगाळ राहणार असून मेघ गर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान आहे. तर पुणे घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल. पुण्यात आज 27 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. साताऱ्यात आज दिवसभर वातावरण ढगाळ राहणार असून संध्याकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरमधील पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, राधानगरी, भुदरगड या भागात पावसाचा अंदाज आहे. आज 28 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
5/7
सांगली जिल्ह्यामध्ये मेघगर्जना वीजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. सांगली मध्ये 25 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
6/7
सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ व करमाळ्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोलापुरात आज ढगाळ वातावरण राहणार असून 26 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान राहील.
advertisement
7/7
राज्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी देखील पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 6 ऑक्टोबरनंतर पावसाचा जोर आणखी वाढणार असून ऑक्टोबरच्या मध्यावर परतीचा पाऊस निरोप घेण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
काहीसा ब्रेक, तरीही अलर्ट! पश्चिम महाराष्ट्रात आज काय आहे पावसाचा अंदाज?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल