पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा कोसळधार! साताऱ्याला यलो अलर्ट, पुण्यात काय स्थिती?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाचा जोर आहे. पश्चिम महाराष्ट्रात आज पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
advertisement
1/7

राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील जोर कायम आहे. आज पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात आज मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
3/7
साताऱ्यात आज जोरदार पाऊस कोसळणार असून जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कराड, मेढा, महाबळेश्वर या ठिकाणी तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. साताऱ्यात 25 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/7
सांगली जिल्ह्यातील मिरज, विटा परिसरात जोरदार पाऊस कोसळेल. जत, आटपाडीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांगली मध्ये 25अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
5/7
कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, भुदरगड, पन्हाळा या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर मध्ये 28 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
6/7
सोलापूर शहर व ग्रामीण भागात आज पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. उत्तर व दक्षिण सोलापूरसह अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला या ठिकाणी आज आभाळ राहणार असून तूरळक पावसाची शक्यता असेल. सोलापूर मध्ये आज 26 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
7/7
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. आता पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा कोसळधार! साताऱ्याला यलो अलर्ट, पुण्यात काय स्थिती?