कुठं विश्रांती तर कुठं जोरधार, पश्चिम महाराष्ट्रात काय आहे पावसाचा अंदाज?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
Weather Forecast: पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर वाढणार असून काही ठिकाणी मात्र पावसाने उघडीप दिली आहे.
advertisement
1/6

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा सक्रीय झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने जोरदार हजेरी लावलीये. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
2/6
पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पुणे शहरात दुपारनंतर मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने पुण्याला पावसाचा यलो अलर्ट दिला असून आज 29 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
3/6
सातारा जिल्ह्याच्या अनेक भागात गुरुवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. पश्चिमेकडील पाटण, महाबळेश्वर, जावळी, सातारा, कऱ्हाड, वाई तालुक्यांत अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने शेतात पाणी साचण्याबरोबर नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. आज पुन्हा साताऱ्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला असून 26 अंश कमाल तर 21 अंश किमान तापमान असेल.
advertisement
4/6
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरूच आहे. गुरुवारी दिवसभर उन्ह पावसाचा खेळ सुरू होता. आज गगनबावडा, भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड व शाहूवाडी तालुक्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर मध्ये 25 अंश कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
5/6
सांगली जिल्ह्यातील काही ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता आहे. तर जिल्ह्यातील मिरज आणि कुपवाड या तालुक्यात जोरदार पाऊस पडेल असं हवामान विभागाने म्हटलं आहे. सांगली मध्ये आज 26 अंश कमाल तर 20 अंश किमान तापमान असेल.
advertisement
6/6
सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला. मात्र सध्या जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, सांगोला, मोहोळ या ठिकाणी पुढील 2 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. सोलापुरात 28 अंश कमाल तर 19 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
कुठं विश्रांती तर कुठं जोरधार, पश्चिम महाराष्ट्रात काय आहे पावसाचा अंदाज?