TRENDING:

तो परत आलाय! पश्चिम महाराष्ट्रात 48 तास महत्त्वाचे, या भागात वादळी पावसाचा अंदाज

Last Updated:
राज्यात परतीच्या मान्सूनने दमदार हजेरी लावलीये. पुढील 2 दिवस राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातही वादळी वारे, मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
1/6
तो परत आलाय! पश्चिम महाराष्ट्रात 48 तास महत्त्वाचे, या भागात वादळी पावसाचा अंदाज
पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार शक्यता आहे. तसेच शिरूर, मंचर, खेड या ठिकाणी देखील जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. पुण्यात आज 28 अंश कमाल तर 21अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
2/6
सातारा जिल्ह्यातील काही भागात सायंकाळी जोरदार वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. साताऱ्यात आज 26 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
3/6
सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील तूर, उडीद पिकांच्या काढणीला या पावसामुळे ब्रेक लागला आहे. मिरज, जत, तासगाव, शिराळा, आटपाडी, पलूस, कडेगाव या भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सांगलीत आज 25 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/6
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ, करवीर, गगनबावडा, राधानगरी, कागल या तालुक्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर मध्ये 27 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
5/6
सोलापूर शहर तसेच ग्रामीण भागात आज दुपारी जोरदार पावसाची शक्यता आहे. बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ या तालुक्यात जोरदार पाऊस पडेल. आज सोलापुरात 25 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
6/6
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात परतीचा मान्सून दाखल झाला असून यामुळे काढणीला आलेल्या शेती पिकांना तसेच फळबागांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
तो परत आलाय! पश्चिम महाराष्ट्रात 48 तास महत्त्वाचे, या भागात वादळी पावसाचा अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल