TRENDING:

पावसाचा जोर ओसरला! पश्चिम महाराष्ट्रातील या ठिकाणी बरसणार हलक्या सरी

Last Updated:
पश्चिम महाराष्ट्रात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. तरीही पुणे, सांगली, सातारा परिसरात घाटमाथ्यावर मध्यम पाऊस तर काही ठिकाणी हलक्या सरी बरसण्याचा अंदाज आहे.
advertisement
1/6
पावसाचा जोर ओसरला! पश्चिम महाराष्ट्रातील या ठिकाणी बरसणार हलक्या सरी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्रात यंदा जोरदार झाला असला तरी आता काहीशी उघडीप घेतली आहे. आज दिवसभर अत्यल्प पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांत मध्यम पावसाचा अंदाज आहे.
advertisement
2/6
पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात आज ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यात 26 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
3/6
सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, महाबळेश्वर, खटाव, मान या ठिकाणी आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या सरी बसरण्याची शक्यता आहे. साताऱ्यात आज 27 अंश कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/6
सांगली जिल्ह्यात आज वातावरण ढगाळ राहणार असून मिरज, विटा परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर जत, आटपाडीमध्येही पावसाचा अंदाज आहे. सांगलीत आज 28 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
5/6
कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, भुदरगड, पन्हाळा या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. कोल्हापूर मध्ये आज 26 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
6/6
सोलापूर व जिल्हा ग्रामीण भागात आज पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. उत्तर व दक्षिण सोलापूरसह अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला या ठिकाणी आज तुरळक पावसाची शक्यता असेल. तर सोलापूर मध्ये आज 24 अंश कमाल तर 20 अंश किमान तापमान असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पावसाचा जोर ओसरला! पश्चिम महाराष्ट्रातील या ठिकाणी बरसणार हलक्या सरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल