पुणे, साताऱ्यात बरसणार, सोलापूरलाही अलर्ट, पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
Weather Forecast: राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला असून पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
1/5

राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला असून पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आहे. पुणे, सोलापूर आणि साताऱ्यात आज हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.
advertisement
2/5
पुणे शहरासह परिसरात आज ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तसेच दुपारनंतर किंवा संध्याकाळी हलका पाऊस पडण्याची होऊ शकतो. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. पुण्यात आज 27 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
3/5
सातारा जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यातील काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कराड, वाई या ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. साताऱ्यात 28 अंश कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/5
कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहील. तर काही ठिकाणी ऊन पडेल.आजरा, करवीर,कागल, गगनबावडा या ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शहरात रात्रीपासूनच पावसाची उघडझाप सुरू आहे. आज कोल्हापुरात 28 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
5/5
सोलापूर जिल्ह्यात आज मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. करमाळा, पंढरपूर, मोहोळ, माढा, सांगोला या ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोलापुरात 26 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पुणे, साताऱ्यात बरसणार, सोलापूरलाही अलर्ट, पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज