TRENDING:

आता स्वेटर बाहेर काढा! पश्चिम महाराष्ट्रात हुडहुडी, थंडीचा जोर वाढणार

Last Updated:
Weather Forecast: दिवाळी संपली तरी राज्यात थंडीची प्रतीक्षाच राहिली. आता वातावरणात बदलाचे संकेत असून गारठा पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/4
आता स्वेटर बाहेर काढा! पश्चिम महाराष्ट्रात हुडहुडी, थंडीचा जोर वाढणार
यंदा पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. पाऊस लांबल्यानं अगदी दिवाळीनंतरही थंडीची प्रतीक्षा होती. आता पुण्यात थंडी जाणवण्यास सुरुवात झाली असून पुणेकरांन आता मात्र स्वेटर बाहेर काढावे लागणार आहेत. आज पुण्यात किमान तापमानात 1 अंशांची घट झाली असून ते 18 अंश सेस्लिअस असणार आहे.
advertisement
2/4
सातारा जिल्ह्यात थंडीचा जोर वाढतोय. काही ठिकाणी तापमानाचा पारा 17 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला आहे. त्यामुळे सकाळी चांगलाच गारठा जाणवतोय. मात्र जिल्ह्यातील कमाल तापमान तिशी पार राहणार असून दुपारी उन्हाचे चटके जाणवतील.
advertisement
3/4
कोल्हापूरमध्ये संमिश्र वातावरण पाहिला मिळत आहे. सकाळी थंडी जाणवत असून दुपारी उष्णतेचा पारा 33 अंशांवर जातोय. आज किमान तापमान 18 अंशांवर राहील.
advertisement
4/4
सोलापूरच्या ग्रामीण भागात थंडी जाणवत आहे. मात्र, तीव्रता कमी आहे. जिल्ह्यात किमान तापमान 21 अंशांवर असून कमाल 33 अंश सेल्सिअस आहे. त्यामुळे नागरिकांना नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबर हिटचे चटके सहन करावे लागत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
आता स्वेटर बाहेर काढा! पश्चिम महाराष्ट्रात हुडहुडी, थंडीचा जोर वाढणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल