पश्चिम महाराष्ट्रासाठी 48 तास महत्त्वाचे, कोल्हापूरसह या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
राज्यात हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी झाला असून आता मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
advertisement
1/5

पुणे जिल्ह्यातील आज वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे. तर पुढील काही दिवस अशाच पद्धतीचं वतावरण पाहिला मिळणार आहे. 28 अंश सेल्सीअस कमाल तर 18 अंशसेल्सीअस किमान तापमान असेल. किमान तापमानात 5 अंशची वाढ ही झाली आहे. पुण्यामध्ये पुढील 48 तासांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
2/5
सातारा जिल्ह्यात आज पावसाच्या हलक्यासरी पडण्याची शक्यता आहे तर वातावरण बहुतांशी ढगाळ राहणार आहे. 28 अंश सेल्सीअस कमाल तर 18 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
3/5
सांगली जिल्ह्यात 31 अंश सेल्सीअस कमाल तर 22 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. आज वातावरण बहुतांशी ढगाळ राहणार असून घाटमाथा भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
कोल्हापूर जिल्ह्यात देखील आज पाऊस पडण्याची शक्यता असून वातावरण बदललेलं आहे. आज आकाश ढगाळ राहणार आहे. तर नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. 30 अंश सेल्सीअस कमाल तर 21 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
5/5
सोलापूर जिल्ह्यातील वातावरण काहीस समिश्र असून मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 29 अंश सेल्सीअस कमाल तर 22 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पश्चिम महाराष्ट्रासाठी 48 तास महत्त्वाचे, कोल्हापूरसह या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?