TRENDING:

धो धो सुरूच! साताऱ्यात वादळी पावसाची शक्यता, पश्चिम महाराष्ट्रातील अपडेट पाहिलं का?

Last Updated:
राज्यात परतीच्या पावसानं विश्रांती घेतली असून आता ऑक्टोबर हिटचे चटके जाणवत आहेत. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत आज पुन्हा पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/6
धो धो सुरूच! साताऱ्यात वादळी पावसाची शक्यता, पश्चिम महाराष्ट्रातील अपडेट पाहिलं
राज्यात गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. आता ऑक्टोबर हिटचे चटके जाणवत आहेत. परंत, पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता आहे. साताऱ्यासह कोल्हापूर, सोलापूर, सांगली, पुणे येथे आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
advertisement
2/6
पुणे शहरासह परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहील. पुणे जिल्ह्यातील हवेली, पुणे शहर, मावळ, मुळशी, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा, पुरंदर, खेड, जुन्नर, आंबेगाव या ठिकाणी मध्यम ते अतिमध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात आज 27 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
3/6
सातारा शहरात सायंकाळी जोरदार वारा, विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोरेगाव, खटाव, कराड, पाटण, वाई, जाओली, महाबळेश्वर, खंडाळा, फलटण आणि माण या तालुक्यात तुफान पावसाची शक्यता आहे. साताऱ्यात 26 अंश कमाल तर 21अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/6
कोल्हापूर जिल्ह्यात आज कुठं पाऊस तर कुठं ऊन अशी स्थिती असेल. कोल्हापूर मधील करवीर, इचलकरंजी ,गडहिंगलज , राधानगरी या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज कोल्हापूर मध्ये 26 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
5/6
सांगली शहरात विजांच्या कडकडाटासह पाऊस होत होता. आता जिल्ह्यातील काही भागातही पावसाने जोर धरला आहे. आज पुन्हा काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सांगलीत 26 अंश कमाल तर 19 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
6/6
सोलापूर शहर व जिल्ह्यात दमदार पाऊस होऊ शकतो. करमाळा, पंढरपूर, मोहोळ, माढा, सांगोला आदी तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढेल असं सांगण्यात येतंय. सोलापूर मध्ये 23 अंश कमाल तर 19 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
धो धो सुरूच! साताऱ्यात वादळी पावसाची शक्यता, पश्चिम महाराष्ट्रातील अपडेट पाहिलं का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल