पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा जोरधार! पावसाचं आजचं अपडेट पाहिलंत का?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
राज्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी जोरदार पाऊस होतोय. आज पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
1/5

पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात या जिल्ह्यांत आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यात आज संध्याकाळी जोरदार पावसाचा अंदाज आहे.पुण्यात 28 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
2/5
सातारा जिल्ह्यात देखील आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाचगणी, महाबळेश्वर आणि वाई या ठिकाणी संध्याकाळ नंतर जोरदार पाऊस कोसळेल.. सातारा जिल्ह्यात 29 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
3/5
सांगली शहरात जोरदार पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. सांगलीत आज 28 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/5
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय. आजही धरणक्षेत्रातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 28 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
5/5
विजेच्या कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह सोलापुरात जोरदार पावसाचा अंदाज आहे. सांगोला, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ या तालुक्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. सोलापूरमध्ये 31 अंश कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.