साताऱ्यात पावसाचं तुफान! पश्चिम महाराष्ट्राला पुन्हा इशारा, आजचं अपडेट पाहिलं का?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
Weather Forecast: राज्यात दिवाळीचे वेध लागले तरी परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
advertisement
1/5

पुणे शहरासह परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिल. पुणे जिल्ह्यातील हवेली, पुणे शहर, मावळ, मुळशी, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा, पुरंदर, खेड, जुन्नर, आंबेगाव या ठिकाणी मध्यम ते अतिमध्यम पावसाची शक्यता आहे. पुण्यात आज 27 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
2/5
सातारा शहरात सायंकाळी जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात, ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोरेगाव, खटाव, कराड, पाटण, वाई, जावली, महाबळेश्वर, खंडाळा, फलटण आणि माण या तालुक्यात तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. साताऱ्यात 26 अंश कमाल तर 21अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
3/5
कोल्हापूर जिल्ह्यात आज काही भागात पाऊस कोसळेल. तर काही ठिकाणी ऊन पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर मधील करवीर, इचलकरंजी, गडहिंगलज, राधानगरी या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज कोल्हापूर मध्ये 26 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/5
सांगली शहरात विजांच्या कडकडाटासह पाऊस होत होता. आता जिल्ह्यातील काही भागातही पावसाने जोर धरला आहे. सांगलीत 26 अंश सेल्सिअस कमाल तर 19 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
5/5
सोलापूर शहर व जिल्ह्यात दमदार पाऊस होऊ शकतो. जिल्ह्यातील करमाळा, पंढरपूर, मोहोळ, माढा, सांगोला आदी तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढेल असं सांगण्यात येतंय. सोलापूर मध्ये 23 अंश कमाल तर 19 सेल्सिअस किमान तापमान असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
साताऱ्यात पावसाचं तुफान! पश्चिम महाराष्ट्राला पुन्हा इशारा, आजचं अपडेट पाहिलं का?