धो धो बरसणार! पश्चिम महाराष्ट्राला हवामान विभागाचा इशारा, कुठं होणार पाऊस?
- Reported by:Shivani Dhumal
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Forecast: राज्यात परतीच्या पावसाचा जोर आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील काही भागात आज पावसाची शक्यता आहे. 25 ऑक्टोबर रोजी हवामान आणि पावसाची काय स्थिती राहील जाणून घेऊ.
advertisement
1/5

पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच शिरूर, मंचर, खेड या ठिकाणी देखील जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. पुण्यात आज 28 अंश कमाल तर 21अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
2/5
सातारा जिल्ह्यातील काही भागात सायंकाळी जोरदार वारे वाहतील. विजांच्या कडकडाटात, ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. साताऱ्यात 26 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
3/5
सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, जत, तासगाव, शिराळा, आटपाडी,पलूस, कडेगाव या भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सांगली जिल्ह्यात 25 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/5
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ, करवीर, गगनबावडा, राधानगरी, कागल या तालुक्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर मध्ये 27 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
5/5
सोलापूर शहर तसेच ग्रामीण भागात आज दुपारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोलापूरमध्ये आज काही प्रमाणात उकाडा जाणवेल. बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ या तालुक्यात जोरदार पाऊस पडेल. आज सोलापूर मध्ये 30 अंश सेल्सिअस कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
धो धो बरसणार! पश्चिम महाराष्ट्राला हवामान विभागाचा इशारा, कुठं होणार पाऊस?