दिवाळीत हवामानात मोठे बदल, पश्चिम महाराष्ट्रात आज काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Weather Forecast: राज्यात दिवाळी सुरू असली तरी पावसाचा जोर कायम आहे. आज पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
advertisement
1/5

पुणे जिल्ह्यातील काही भागात बुधवारी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील वातावरणात गारवा वाढत आहे. दिवसभर ऊन तर सकाळ, संध्याकाळी थंडी असं चित्र आहे. आज पुण्यात 33 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
2/5
सातारा जिल्ह्यात आज आकाश निरभ्र राहणार असून आजूबाजूच्या परिसरात थंडी जाणवण्यास सुरुवात झाली आहे. साताऱ्यात आज 31 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
3/5
कोल्हापूर शहरामध्ये पहाटेपासून धुकं दिसत आहे. बुधवारी सायंकाळी हलका पाऊस झाला. तर जिल्ह्यात देखील ऊन, पाऊस आणि थंडी अशी हवामान स्थिती आहे. आज कोल्हापूर मध्ये आज 31 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/5
सांगली जिल्ह्यात देखील काही ठिकाणी हलका पाऊस झाला. आज पुन्हा आकाश अंशत: ढगाळ राहणार असून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात आज 32 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
5/5
सोलापूर मध्ये आज समिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळच्या वेळेस गारवा तर दुपारच्या वेळेस पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोलापूर मध्ये आज 31 अंश सेल्सिअस कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.