TRENDING:

धो धो सुरूच! पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Last Updated:
Weather Update: महाराष्ट्रातील विविध भागात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरसह सातारा, पुणे या जिल्ह्यांना हवामान विभागाने इशारा दिला आहे.
advertisement
1/5
धो धो सुरूच! पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा जोरधार, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. परंतु पुणे शहरात आज ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. पुण्यात 25 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
2/5
सातारा जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, महाबळेश्वर, खटाव, मान या ठिकाणी आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळतील. साताऱ्यात आज 26 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
3/5
सांगली जिल्ह्यात आज वातावरण ढगाळ राहणार असून मिरज, विटा परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर जत, आटपाडीमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. आज सांगलीत 28 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/5
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. आज पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यातील गगनबावडा, राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, भुदरगड, पन्हाळा या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोल्हापूर मध्ये 26 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
5/5
सोलापूर व जिल्हा ग्रामीण भागात आज पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. उत्तर व दक्षिण सोलापूरसह अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला या ठिकाणी आज आकाश ढगाळ राहणार असून तुरळक पावसाची शक्यता असेल. तर सोलापूर मध्ये आज 27 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
धो धो सुरूच! पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल