रविवारची सुट्टी पावसाची! पश्चिम महाराष्ट्रात जोरधार, साताऱ्याला IMD चा अलर्ट
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
राज्यात पुन्हा एकदा परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. आज पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असून साताऱ्याला अलर्ट देण्यात आलाय.
advertisement
1/6

महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहेत. परतीच्या जोर पुन्हा वाढला असून ऑक्टोबर हिटचे चटकेही सहन करावे लागत आहेत. अशातच आज विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
advertisement
2/6
पुणे शहराचे हवामान ढगाळ राहून मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस पुणे शहरात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुण्यात 29 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
3/6
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये संततधार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचे आगार मानल्या जाणाऱ्या पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी, चंदगड तालुक्यामध्ये यंदा जोरदार पावसाची नोंद झाली आहे. आज पुन्हा पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोल्हापुरात 27 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/6
सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्यासाठी हवामान विभागानं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, महाबळेश्वर परिसरात 102 मिलीमिटर पावसाची नोंद असून त्या ठिकाणी आणखी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. साताऱ्यात 25 अंश कमाल तर 19 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
5/6
सांगली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून कधी ऊन, तर कधी हलका पाऊस पडत आहे. या आठवड्यात सांगली जिल्ह्यातील दमदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. सांगलीमध्ये 27 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
6/6
सोलापूर जिल्ह्यात आज मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. करमाळा, पंढरपूर, मोहोळ, माढा, सांगोला या ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोलापूर मध्ये 26 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
रविवारची सुट्टी पावसाची! पश्चिम महाराष्ट्रात जोरधार, साताऱ्याला IMD चा अलर्ट