साताऱ्यात पारा घसरला, थंडीची तीव्रता पुन्हा वाढणार, पश्चिम महाराष्ट्रात आज काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Weather Forecast: राज्यात नोव्हेंबर महिना अखेरीस गारठा वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आजच्या हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/5

राज्यात येत्या आठवड्यात तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील वातावरण आज अंशता ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. तसेच तापमानात घट झाली असून किमान 17 अंश तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
2/5
सातारा जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. आज सर्वात कमी 15 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालीये. तर कमाल तापमान 29 अंशांवर आहे. त्यामुळे दुपारी उकाडा देखील जाणवत आहे.
advertisement
3/5
सांगली जिल्ह्यात वातावरण सूर्यप्रकाशित राहून पुढील काही दिवस वातावरणात मोठे बदल जाणवणार नाहीत. किमान तापमानात मात्र घट होण्याची शक्यता असून आज तापमानाचा पारा 16 अंशांवर असणार आहे. तर कमाल तापमान तिशीपार 31 अंशांवर असेल.
advertisement
4/5
कोल्हापूर जिल्ह्यात पहाटे धुक्याची चादर पसरलेली पाहिला मिळत आहे. आज वातावरण संमिश्र स्वरूपाच असणार आहे. 30 अंश सेल्सिअस कमाल तर 16 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
5/5
सोलापूर जिल्ह्यात वातावरण आज पूर्णतः ढगाळ राहणार आहे. सोलापुरात देखील थंडीची तीव्रता वाढली आहे. आज किमान तापमान 16 अंशांपर्यंत राहणार आहे. तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
साताऱ्यात पारा घसरला, थंडीची तीव्रता पुन्हा वाढणार, पश्चिम महाराष्ट्रात आज काय स्थिती?