पुणे आणि साताऱ्यात थंडीचा कडाका, कोल्हापूरमध्ये राहणार ढगाळ वातावरण, पाहा पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. पुणे आणि साताऱ्यात पारा घसरला आहे.
advertisement
1/5

पुणे जिल्ह्यात आज 29 अंश सेल्सीअस कमाल तर 13 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. कमाल आणि किमान तापमानात घट झाल्यामुळे थंडी जाणवत आहे. आज पुणे जिल्ह्यातील वातावरण हे सूर्यप्रकाशित राहणार आहे.
advertisement
2/5
सातारा जिल्ह्यातील वातावरण बहुतांशी ढगाळ राहणार असून 29 अंश सेल्सीअस कमाल तर 13 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. किमान तापमानात घट झाल्यामुळे थंडीचा कडाका जाणवत आहे.
advertisement
3/5
सांगली जिल्ह्यातील वातावरण हे ढगाळ राहणार असून 31 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. 1 अंशाची घट ही कमाल आणि किमान तापमानात झाली आहे.
advertisement
4/5
कोल्हापूरमध्ये 31 अंश सेल्सीअस कमाल तर 15 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. वातावरण हे बहुतांशी ढगाळ राहणार आहे. थंडी जाणवण्यास पुन्हा सुरुवात होत आहे.
advertisement
5/5
सोलापूरमध्ये ढगाळ वातावरण असून 31 अंश सेल्सीअस कमाल तर 15 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पुणे आणि साताऱ्यात थंडीचा कडाका, कोल्हापूरमध्ये राहणार ढगाळ वातावरण, पाहा पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज