साताऱ्यात तापमानात घट, पुण्यात काय स्थिती? पाहा आजचा हवामान अंदाज
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Western Maharashtra Weather update: पश्चिम महाराष्ट्रात डिसेंबर महिन्यात हवामान सातत्याने बदलताना दिसत आहे. आजच्या हवमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/5

पुणे जिल्ह्यात 30 अंश सेल्सीअस कमाल तर 17 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. तर वातावरण हे सूर्यप्रकाशित राहणार आहे.
advertisement
2/5
सातारा जिल्ह्यात वातावरण हे समिश्र राहणार असून 29 अंश सेल्सीअस कमाल तर 16 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. तर कमाल आणि किमान दोन्ही तापमानात 1 ते 2 अंशाची घट झाली आहे.
advertisement
3/5
सांगली जिल्ह्यातील वातावरण हे सूर्यप्रकाशित असून शेतकऱ्यांनी बागायती ज्वारीमध्ये मध्यम जमिनीत तिसरे पाणी पिक फुलोऱ्यात असताना पेरणीनंतर 70 ते 75 दिवसांनी आणि कणसात दाणे भरताना पेरणीनंतर 90 ते 95 दिवसांनी दयावे. 31 अंश सेल्सीअस कमाल तर 18 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
4/5
कोल्हापूर मधील वातावरण हे 31 अंश सेल्सीअस कमाल तर 17 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. शेतकऱ्यांनी सुरु उसाची लागवड करण्यासाठी जमीन तयार करावी.
advertisement
5/5
सोलापूरमध्ये वातावरण हे सूर्यप्रकाशित राहणार असून 31 अंश सेल्सीअस कमाल तर 18 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. कांदा पिकावर काही ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. नियंत्रणासाठी डायफेनकोनॅझोल 25 % ई.सी. @ 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.