TRENDING:

तो पुन्हा आलाय! सांगली, कोल्हापुरात वारं फिरलं, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

Last Updated:
Weather Forecast: राज्यात थंडीचा जोर वाढत असतानाच पुन्हा वातावरणात बदल जाणवत आहे. कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
advertisement
1/5
तो पुन्हा आला! सांगली, कोल्हापुरात वारं फिरलं, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
पुणे जिल्ह्यात यंदा पावसाने अगदी दिवाळीपर्यंत हजेरी लावली. आता पुण्यातील वातावरणात गारवा जाणवत आहे. आज आकाश अंशत: ढगाळ राहणार असून बहुतांश ठिकाणी सूर्यप्रकाश जाणवेल. पुण्यातील किमान तापमानात पुन्हा वाढ झाली असून आज ते 21 अंशांवर तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस असणार आहे.
advertisement
2/5
साताऱ्यात देखील किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीची तीव्रता कमी झाली आहे. आज 31 अंश सेल्सीअस कमाल तर 20 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. जिल्ह्यातील वातावरणात पुन्हा बदल जाणवत असून उद्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
3/5
सांगली जिल्ह्यात आज सकाळी ढगाळ वातावरण असून दुपार नंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. सांगली जिल्ह्यात आज 32 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/5
कोल्हापूर जिल्ह्यात देखील आज पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज 32 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
5/5
सोलापूरमध्ये आज अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे. तर आज 32 अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
तो पुन्हा आलाय! सांगली, कोल्हापुरात वारं फिरलं, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल