आता ऊन अन् थंडीचा जोर, पश्चिम महाराष्ट्रात आज कसं असेल हवामान?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Weather Forecast: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात दिवाळीनंतर मोठे बदल जाणवत आहेत. आता थंडीचा जोर वाढत असून काही ठिकाणी पारा 17 अंशांवर आला आहे. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5

पुणे शहर तसेच जिल्ह्यात थंडी जाणवण्यास सुरुवात झाली आहे. आज तापमानात कुठली ही घट झालेली नाही. रात्री थंडी जाणवत आहे तर दिवसा उष्णता आणि उकाडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. आज पुण्यात 32 अंश सेल्सिअस कमाल तर 19 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
2/5
सातारा जिल्ह्यात आज वातावरण समिश्र जाणवत असून सकाळी ऊन तर दुपार नंतर ढगाळ राहणार आहे. पश्चिमेकडील पाटण, महाबळेश्वर, जावळी, सातारा,वाई या भागात थंडी जाणवण्यास सुरुवात झाली आहे. साताऱ्यात आज 31 अंश सेल्सीअस कमाल तर 17 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
3/5
सांगली जिल्ह्यात वातावरणात बदल दिसत आहेत. आज 32 अंश सेल्सीअस कमाल तर 19 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल. अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील शेती कामे सुरू आहेत. तर काही ठिकाणी भात काढणीच्या कामांनाही वेग आलाय.
advertisement
4/5
कोल्हापूर जिल्ह्यात आज वातावरण ढगाळ राहणार असून तापमानात घट झाली आहे. आज कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 18 अंश सेल्सिअस असेल. जिल्ह्यात थंडीचा जोर वाढत असून लोक स्वेटर, मफलर आणि इतर उबदार कपड्यांची खरेदी करताना दिसत आहेत.
advertisement
5/5
सोलापूर मध्ये आज काहीसा उकाडा जाणवणार आहे. तर वातावरण सूर्यप्रकाशित राहण्याची शक्यता आहे. आज जिल्ह्यात 33 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.