परतीच्या पावसाचा धुमाकूळ! पश्चिम महाराष्ट्रात धो धो सुरूच, आज काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
Weather Update: गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. आज पुण्यासह कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/6

राज्यात परतीच्या पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. आज पुन्हा एकदा पुणे, सातारा, कोल्हापुरात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
2/6
पुणे शहरात दिवसभर वातावरण ढगाळ असेल. काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच जुन्नर, मंचर, खेड, पुरंदर, शिरूर या भागात देखील आज काही प्रमाणात पाऊस कोसळेल. पुण्यात आज 29 अंश कमाल तर 25 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
3/6
सातारा जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोरेगाव, खटाव, कराड, पाटण, वाई, जावळी महाबळेश्वर, खंडाळा, फलटण आणि माण या तालुक्यात आज तुफान पावसाचा अंदाज आहे. साताऱ्यात 27 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/6
सांगली जिल्ह्यात आज मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज पावसाचा जोर वाढेल. सांगली मध्ये आज 27 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
5/6
गेल्या 3 दिवसांपासून कोल्हापूर शहरात पावसाचा जोर कायम आहे. आज जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इचलकरंजी, गडहिंग्लज, शिरोळमध्ये देखील आज दमदार पाऊस होईल.कोल्हापूर शहरात आज 28 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
6/6
सोलापूर जिल्ह्यात बुधवारी काही भागात पावसाची उसंत पाहायला मिळाली. तर आज मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, सांगोला, मोहोळ या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. सोलापुरात 30 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
परतीच्या पावसाचा धुमाकूळ! पश्चिम महाराष्ट्रात धो धो सुरूच, आज काय स्थिती?