आजचा दिवस पावसाचा! पश्चिम महाराष्ट्रात जोरधार, पुण्याला अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
Weather Update: पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचे चटके आणि पावसाच्या सरी एकाच दिवशी असल्याचं चित्र आहे. पुण्यासह सर्व जिल्ह्यांना आज पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आलाय.
advertisement
1/6

गेल्या काही दिवसांत राज्यातील जनतेला दुहेरी संकटाचा सामना करावा लागतोय. एकीकडे ऑक्टोबर हिटचे चटके सहन करावे लागत असतानाच काही ठिकाणी परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रात आज पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
2/6
पुणे जिल्ह्याचा घाट विभागात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे शहरात आज ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज असून पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात 25 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
3/6
सातारा जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, महाबळेश्वर, खटाव, मान या ठिकाणी आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. साताऱ्यात आज 26 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/6
सांगली जिल्ह्यात आज वातावरण ढगाळ राहणार असून मिरज, विटा परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर जत, आटपाडीमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज सांगलीत 28 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
5/6
कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, भुदरगड, पन्हाळा या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर शहरातही पुन्हा पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर मध्ये 26 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
6/6
सोलापूर व जिल्हा ग्रामीण भागात आज पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. उत्तर व दक्षिण सोलापूरसह अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला या ठिकाणी आज आभाळ राहणार असून तुरळक पावसाची शक्यता असेल. तर सोलापूर मध्ये आज 27 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.