Weather Forecast: सुट्टीदिवशी हजेरी! पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, 3 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
Weather Forecast: राज्यात परतीच्या पावासने विश्रांती घेतली आहे. पण दिवाळीपर्यंत मुक्काम राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यात पाऊस ओसरला आहे. मात्र, आज पश्चिम महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली जातेय.
advertisement
1/5

पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर अधून मधून वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुण्यात 27 अंश कमाल तर 21 अंश सेल्सीअस किमान तापमान असेल.
advertisement
2/5
सातारा जिल्ह्यात अनेक भागात आज देखील ढगाळ वातावरण असेल. पाटण, महाबळेश्वर, जावळी, सातारा, कऱ्हाड, वाई तालुक्यांत अनेक ठिकाणी तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. साताऱ्यात आज 26 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
3/5
सांगली जिल्ह्यातील मिरज, जत, तासगाव, शिराळा, आटपाडी, पलूस, कडेगाव या तालुक्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सांगली जिल्ह्यात 27 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/5
कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहील, तर काही ठिकाणी ऊन पडेल. आजरा, करवीर, कागल, गगनबावडा या ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोल्हापूर मध्ये आज 26 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
5/5
सोलापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. करमाळा, पंढरपूर, मोहोळ, माढा, सांगोला या ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोलापूर मध्ये 23 अंश कमाल तर 21अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Forecast: सुट्टीदिवशी हजेरी! पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, 3 जिल्ह्यांना अलर्ट