TRENDING:

लक्ष्मीपूजनाला पावसाची हजेरी! वातावरणात मोठे बदल, पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज

Last Updated:
Weather Forecast: राज्यात दिवाळी सुरू असली तरी पावसाचा जोर कायम आहे. आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुन्हा पावसाचा अंदाज आहे.
advertisement
1/5
लक्ष्मीपूजनाला पावसाची हजेरी! वातावरणात बदल, पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज
  पुणे शहर तसेच जिल्ह्यातील वातावरणात मोठे बदल जाणवत आहेत. आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपार पर्यंत पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडत असाल तर योग्य नियोजन करा. आज पुण्यात 32 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
2/5
सातारा जिल्ह्यामध्ये आज वातावरण ढगाळ तर काही अंशी सूर्यप्रकाशित असणार आहे. तर पश्चिमेकडील पाटण, महाबळेश्वर, जावळी, सातारा,वाई या भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. साताऱ्यात आज 29 अंश सेल्सिअस कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
3/5
सांगली जिल्ह्यात आज जोरदार वारा आणि विजांचा कडकडाटात पावसाची शक्यता आहे. तर समिश्र वातावरण राहील. सांगली जिल्ह्यात आज 31अंश सेल्सिअस कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/5
कोल्हापूर जिल्ह्यात आज आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. कोल्हापूर मध्ये आज 29 अंश कमाल तर 22 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
5/5
सोलापूर जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रात वातावरणात ऊन पडण्याची शक्यता आहे. तर दुपारनंतर वातावरण ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी. सोलापूर मध्ये आज 31 अंश सेल्सिअस कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
लक्ष्मीपूजनाला पावसाची हजेरी! वातावरणात मोठे बदल, पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल