TRENDING:

पश्चिम महाराष्ट्राला हुडहुडी! या जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता, आजचं हवामान अपडेट 

Last Updated:
Weather Forecast: राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून आता थंडीचा जोर वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रात आज बहुतांश ठिकाणी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.  
advertisement
1/5
पश्चिम महाराष्ट्राला हुडहुडी! या जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता
पुणे जिल्ह्यातील वातावरणात बदल जाणवत असून दुपारपर्यंत ऊन तर त्यानंतर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पावसाची शक्यता देखील असून पुण्यात 32 अंश कमाल तर 19 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
2/5
सातारा जिल्ह्यात संमिश्र वातावरण राहणार आहे. पश्चिमेकडील पाटण, महाबळेश्वर, जावळी, सातारा,वाई या भागात आज आकाश अंशता ढगाळ राहणार आहे. आज साताऱ्यात 31 अंश कमाल तर 18 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
3/5
सांगली जिल्ह्यामध्ये वातावरण अंशत: ढगाळ राहणार असून उद्या आकाश निरभ्र राहणार आहे. सांगलीत आज 32 अंश सेल्सिअस कमाल तर 19 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
4/5
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थोडी थंडी जाणवण्यास सुरुवात झाली असून वातावरण ढगाळ असणार आहे. कोल्हापूरमध्ये आज 32 अंश सेल्सिअस कमाल तर 19 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
advertisement
5/5
सोलापूर जिल्ह्यामध्ये आकाश निरभ्र राहणार असून अधून मधून ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये आज 33 अंश सेल्सिअस कमाल तर 21अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पश्चिम महाराष्ट्राला हुडहुडी! या जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता, आजचं हवामान अपडेट 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल