TRENDING:

सोनं-चांदी खरेदीसाठी अत्यंत शुभ मुहूर्त! वर्षभरात याच वेळची खरेदी भरभराटीची

Last Updated:
ज्योतिषशास्र सांगतं, कोणत्याही शुभ कार्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहावा, अगदी महत्त्वाची खरेदी करतानाही. दिवाळीत अनेकजण सोनं खरेदी करतात. दिवाळी सण हा अत्यंत शुभ असतोच, परंतु त्यातही सुवर्ण असा योग असतो, ज्यात सोनं खरेदी करणं भरभराटीचं ठरू शकतं. ही वेळ नेमकी कोणती आहे जाणून घेऊया. (ईशा बिरोरिया, प्रतिनिधी / ऋषिकेश)
advertisement
1/5
सोनं-चांदी खरेदीसाठी अत्यंत शुभ मुहूर्त! वर्षभरात याच वेळची खरेदी भरभराटीची
ज्योतिषी सांगतात की, सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी खास मुहूर्त असतात. या मुहूर्तावर दागिने खरेदी केल्यास त्यातून आपल्या वाट्याला सुख येऊ शकतं. घरात धन-धान्याची वृद्धी होऊ शकते, आपली आर्थिक स्थिती सुधारू शकते.
advertisement
2/5
दिवाळीच्या काही दिवसांपूर्वी एका खास नक्षत्राचं आगमन होतं. त्याला म्हणतात पुष्य नक्षत्र. या नक्षत्रात सोनं, चांदी खरेदी करणं लाभदायी मानलं जातं.
advertisement
3/5
यंदा 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी सुरू झालेलं हे नक्षत्र 25 ऑक्टोबर रोजी 12 वाजून 31 मिनिटांपर्यंत असेल. त्यामुळे या काळात आपण सोनं, चांदी आवर्जून खरेदी करू शकता. आयुष्यात प्रगतीचा काळ अनुभवण्याची ही सुवर्ण संधी आहे.
advertisement
4/5
पुष्य नक्षत्रात सोन्या, चांदीच्या दागिन्यांव्यतिरिक्त जमीन, घर, वाहन किंवा घरातील एखादी नवी वस्तू खरेदी करणंही लाभदायी ठरतं. यामुळे घरात सुख, समृद्धी येते.
advertisement
5/5
सूचना: इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
सोनं-चांदी खरेदीसाठी अत्यंत शुभ मुहूर्त! वर्षभरात याच वेळची खरेदी भरभराटीची
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल