Dreaming Money Means: पैसाच पैसा...! झोपेत तुम्हाला अशी स्वप्ने दिसतात का? असे असतात शुभ-अशुभ संकेत
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Dreaming Money Means : प्रत्येक व्यक्ती झोपेत असताना स्वप्ने पाहतो. स्वप्न पाहणं ही एक सर्वसामान्य गोष्ट आहे. काही स्वप्ने अशी असतात, जी पाहून शुभ-अशुभ संकेत मिळतात. यापैकी एक म्हणजे स्वप्नात पैसे पाहणे. स्वप्नात पैसा पाहून साहजिकच प्रत्येक व्यक्ती आनंदी होतो. पण, स्वप्नात पैसा दिसणे हे प्रत्येक वेळी शुभ किंवा अशुभ असेलच असे नाही. स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात पैसा पाहण्याचा अर्थ शुभ आणि अशुभ दोन्ही असू शकतो. तुम्ही कोणत्या परिस्थितीत पैसे पाहिले यावर ते अवलंबून आहे. स्वप्नात पैसा पाहण्याचा अर्थ काय? याविषयी ज्योतिषी आणि वास्तुतज्ज्ञ पंडित हितेंद्रकुमार शर्मा सांगत आहेत.
advertisement
1/6

स्वप्नशास्त्रानुसार, जर कोणी स्वप्नात तुम्हाला करकरीत, नव्या नोटा देताना दिसलं. तर हे स्वप्न म्हणजे आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे लक्षण आहे. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, तुमची कमाई वाढू शकते आणि तुम्ही पैशाच्या तंगीपासून मुक्त होऊ शकता.
advertisement
2/6
-स्वप्नशास्त्रात सांगितल्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात पैसे खुळखुळताना दिसले तर तो अशुभ संकेत मानतात. या स्वप्नानुसार एखाद्या व्यक्तीला नजीकच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
3/6
स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात जर तुम्ही स्वतःला बँक खात्यात पैसे जमा करताना पाहिले तर ते शुभ लक्षण मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, तुम्हाला कुठूनतरी अचानक पैसे मिळणार आहेत.
advertisement
4/6
स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात पैसा हरवल्याचे किंवा फाटलेल्या नोटा दिसल्या तर असं सूचित होतं की, तुम्ही पैशाशी संबंधित योग्य काम करत नाही आहात. यामुळे तुमच्या चालू असलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. अशा स्थितीत तुम्ही व्यवहार, गुंतवणूक आणि कमाईमध्ये सावधगिरी, प्रामाणिकपणा बाळगला पाहिजे.
advertisement
5/6
जर तुम्ही स्वप्नात जमिनीवर पडलेले पैसे उचलताना पाहिले तर ते पैशाचे नुकसान दर्शवते. हे स्वप्न स्वप्न शास्त्रात गरिबीचे लक्षण मानले जाते.
advertisement
6/6
स्वप्नात जर तुम्ही स्वतःला हवेत पैसे उधळताना पाहिले तर स्वप्न शास्त्रानुसार हे सामान्य लक्षण मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, तुम्ही लोकांना पैशांच्या व्यवस्थापनाबाबत योग्य सल्ला देणार आहात. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Dreaming Money Means: पैसाच पैसा...! झोपेत तुम्हाला अशी स्वप्ने दिसतात का? असे असतात शुभ-अशुभ संकेत