रोज हनुमान चालीसा पठण करण्याचे काय आहेत फायदे?
- Published by:News18 Lokmat
- local18
Last Updated:
संकटनिवारक देव म्हणून मारुतीला विशेष महत्त्व आहे. मारुतीची कृपा काय राहावी म्हणून अनेक जण हनुमान चालिसाचं पठण करतात.
advertisement
1/7

संकटनिवारक देव म्हणून मारुतीला विशेष महत्त्व आहे. मारुतीची कृपा काय राहावी म्हणून अनेक जण हनुमान चालिसाचं पठण करतात. श्रीरामाचे परमभक्त असलेल्या हनुमानाचे नामस्मरण केल्यानंतर सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे.
advertisement
2/7
रोज हनुमान चालीसा पठण करण्याचे काय फायदे आहेत? याची माहिती<a href="https://news18marathi.com/pune/" target="_blank" rel="noopener"> पुण्यातले</a> ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिलीय.
advertisement
3/7
दररोज हनुमान चालीसाचे पाठ केल्याने भीतीपासून मुक्ती मिळते. आयुष्यात बर्याच वेळा एखाद्या व्यक्तीला अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून भीती वाटू लागते. हनुमान चालीसाचे पठण केल्यानं त्याची भीती दूर होते.
advertisement
4/7
हनुमान चालीसाचे पठण केल्याने व्यक्तीला आर्थिक त्रासातून मुक्तता मिळते. तुम्हाला कर्जामुळे त्रास होत असेल तर दररोज हनुमान चालीसाचे पठण करावे. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल, असं जोशी यांनी सांगितलं.
advertisement
5/7
रोज हनुमान चालीसाचे पठण केल्यास कोणत्याही प्रकारच्या कामात अडथळा येत नाही. त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळू लागते. हनुमान चालीसाचे पठण केल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता वाढते.
advertisement
6/7
हनुमान चालीसाचे नियमित पाठ केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. हनुमानजीच्या भक्तांवर कोणाचीही वाईट नजर पडत नाही. असा दावा जोशी यांनी केलाय.
advertisement
7/7
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)