TRENDING:

आज हनुमान जयंती! मारुती स्तोत्राचे पठण पालटणार नशीब, कधी, कसं आणि किती वेळा करावं?

Last Updated:
चैत्र पौर्णिमेच्या या पावन मुहूर्तावर संकटमोचन हनुमानाची उपासना केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रात विशेषतः समर्थ रामदास स्वामी रचित 'मारुती स्तोत्राला' अनन्यसाधारण महत्त्व आहे.
advertisement
1/7
आज हनुमान जयंती! मारुती स्तोत्राचे पठण पालटणार नशीब, कधी, कसं आणि किती वेळा करावं?
चैत्र पौर्णिमेच्या या पावन मुहूर्तावर संकटमोचन हनुमानाची उपासना केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रात विशेषतः समर्थ रामदास स्वामी रचित 'मारुती स्तोत्राला' अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे मानले जाते की, मारुती स्तोत्राचे शास्त्रोक्त पद्धतीने केलेले पठण केवळ भीती दूर करत नाही, तर मनुष्याचे नशीब पालटण्याची ताकद ठेवते.
advertisement
2/7
पठणाची सर्वोत्तम वेळ: हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी मारुती स्तोत्राचे पठण करण्यासाठी 'ब्रह्म मुहूर्त' किंवा 'सूर्योदयाची' वेळ सर्वोत्तम मानली जाते. जर सकाळी शक्य नसेल, तर सायांकाळी सूर्यास्ताच्या वेळी दिवा लावून स्तोत्र पठण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
advertisement
3/7
कसे करावे पठण?: स्तोत्र पठणापूर्वी स्नान करून स्वच्छ आणि शक्य असल्यास लाल किंवा केशरी रंगाचे वस्त्र परिधान करावे. हनुमंताच्या मूर्तीसमोर किंवा तसबिरीसमोर बसून शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. आसन म्हणून लोकरीचे किंवा कुशाचे आसन वापरावे, जेणेकरून ऊर्जेचा क्षय होणार नाही.
advertisement
4/7
किती वेळा करावे पठण?: सामान्यतः दिवसातून एकदा मारुती स्तोत्र म्हणणे शुभ असते. मात्र, जर तुम्ही एखाद्या विशिष्ट संकटात असाल किंवा तुमची एखादी इच्छा प्रदीर्घ काळ प्रलंबित असेल, तर आजच्या दिवशी 11, 21 किंवा 108 वेळा स्तोत्र पठण करण्याचा संकल्प करावा. 'भीमरूपी महारुद्रा'चे अकरावे पठण पूर्ण झाल्यावर मारुतीराया प्रसन्न होतात, असे समर्थ रामदास स्वामींनी स्तोत्राच्या शेवटी नमूद केले आहे.
advertisement
5/7
एकाग्रता आणि स्पष्ट उच्चार: मारुती स्तोत्र हे केवळ शब्द नसून ती मंत्रशक्ती आहे. पठण करताना उच्चार स्पष्ट आणि खणखणीत असावेत. 'भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती' या ओळींमधील वीररसाचा अनुभव घेत पठण केल्याने शरीरातील सप्तचक्र जागृत होतात आणि आत्मविश्वास वाढतो.
advertisement
6/7
रामनामाचा आधार: हनुमानजींना प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रभू श्रीरामांचे स्मरण. मारुती स्तोत्र सुरू करण्यापूर्वी आणि संपल्यानंतर किमान 108 वेळा 'श्री राम जय राम जय जय राम' या मंत्राचा जप करावा. जिथे रामनाम घेतले जाते, तिथे मारुतीराया सदैव सूक्ष्म रूपाने उपस्थित असतात.
advertisement
7/7
फळ आणि लाभ: मारुती स्तोत्राच्या नियमित पठणाने शरीरातील रोगराई दूर होते, भीती नष्ट होते आणि बुद्धीची प्रगल्भता वाढते. विशेषतः ज्यांना शनीची साडेसाती सुरू आहे, त्यांच्यासाठी हे स्तोत्र एक 'सुरक्षा कवच' म्हणून काम करते. आजच्या दिवशी केलेले पठण तुमच्या प्रगतीतील सर्व अडथळे दूर करणारे ठरेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
आज हनुमान जयंती! मारुती स्तोत्राचे पठण पालटणार नशीब, कधी, कसं आणि किती वेळा करावं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल