TRENDING:

Ram Navami 2024: राम जन्मला गं सखे.... मुलांसाठी खास श्रीराम प्रेरित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

Last Updated:
Lord Ram Baby Names : बाळाचं नाव ठेवण्यासाठी अलिकडे पालक फार विचार करतात. नावाचा काही तरी चांगला अर्थ असावा अशी अनेकांची इच्छा असते. काहींना नवसानं मुल होतं, असे लोक तर देवावरून बाळाचं नाव ठेवण्याला प्राधान्य देतात. धार्मिक श्रद्धा असलेले बहुतांशी लोक एखाद्या देवाच्या नावावरून आधुनिक नाव ठेवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी श्रीराम, गणपती, विष्णू, हनुमान यांच्या विविध नावांना लोकांची पसंती असते. प्रभू श्रीरामांची काही नावे आपण जाणून घेऊ, ती तशी आधुनिक आणि अद्वितीय आहेत. जर तुम्हीही तुमच्या मुलासाठी एखादं नवीन नाव शोधत असाल तर तुम्ही भगवान रामाच्या या नावांचा विचार करू शकता.
advertisement
1/6
राम नवमीला मुलगा झाला तर? श्री रामावरून ही 6 खास नावं ठेवू शकता
अविराज: अविराज हे भगवान रामाच्या अनेक नावांपैकी एक आहे. आजच्या आधुनिक दृष्टिकोनातून बघितलं तर ते एक अतिशय अनोखं नाव आहे. अविराज म्हणजे सूर्याप्रमाणे चमकणारा. जर तुम्हाला तुमच्या मुलाचे नाव <a href="https://news18marathi.com/tag/ram-navami/">भगवान रामाच्या नावावर</a> ठेवायचे असेल तर हा एक चांगला पर्याय असू शकतो.
advertisement
2/6
मानविक: हे भगवान रामाचे एक नाव आहे. तुमचा मुलगा हुशार, दयाळू आणि देवावर विश्वास ठेवणारा बनवायचा असेल तर तुम्ही तुमच्या मुलाचे नाव मानविक ठेवू शकता.
advertisement
3/6
विराज: विराज हे प्रभू रामाच्या अनेक नावांपैकी एक आहे, भगवान राम हे सूर्यवंशी होते, म्हणून त्यांना सूर्याचा राजा देखील म्हटले जाते आणि या नावाचा अर्थही तोच आहे. आधुनिक युगाच्या अनुषंगाने पाहिले तर ते एक अतिशय वेगळे नाव आहे. राम नवमी शुभेच्छा मराठी (<a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/shri-ram-navami-2024-wishes-messages-quotes-wallpaper-whatsapp-facebook-status-shubhechcha-in-marathi-mhpj-1164431.html">Ram Navami Wishes In Marathi</a>)
advertisement
4/6
शाश्वत: सनातन धर्माचे दुसरे नाव शाश्वत आहे आणि हे <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/ram-laxman-bharat-shatrughan-ke-bete-ka-naam-gh-mhpr-1164495.html">राजारामाचेही नाव</a> आहे. हे नाव जेवढे अद्वितीय आहे तेवढेच त्यात वेगळेपण आहे. म्हणून आपण आपल्या मुलाचे असे नाव ठेवू शकता.
advertisement
5/6
अद्वैत: अद्वैत हे भगवान रामाचे नाव आहे. तुम्ही तुमच्या मुलाचे हे नाव ठेवू शकता. या नावाचा अर्थ अविश्वसनीय आहे किंवा त्याच्यासारखा कोणीही नाही.
advertisement
6/6
अथर्व: चार वेदांपैकी एक अथर्व आहे आणि ते भगवान रामाचे नाव देखील आहे. या नावाचा अर्थ वेदांचा जाणता, असे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Ram Navami 2024: राम जन्मला गं सखे.... मुलांसाठी खास श्रीराम प्रेरित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल