संक्रांती आणि एकादशीचा शुभ योग, पण आज 'ही' चूक करणं पडू शकत महागात; लागू शकतो दोष
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
मकर संक्रांतीचा सण हा सूर्याच्या उपासनेचा आणि दानाचा सण मानला जातो. या दिवशी खिचडी खाण्याला आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे, म्हणूनच याला 'खिचडी पर्व' असेही म्हणतात.
advertisement
1/7

मकर संक्रांतीचा सण हा सूर्याच्या उपासनेचा आणि दानाचा सण मानला जातो. या दिवशी खिचडी खाण्याला आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे, म्हणूनच याला 'खिचडी पर्व' असेही म्हणतात.
advertisement
2/7
ज्योतिषशास्त्रानुसार, खिचडीमध्ये वापरले जाणारे तांदूळ, डाळ आणि मसाले हे नऊ ग्रहांचे प्रतीक असतात. मात्र, यंदा 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांतीसोबतच षटतिला एकादशीचा दुर्मिळ योगायोग आला आहे.
advertisement
3/7
लसूण आणि कांदा: संक्रांतीची खिचडी हा देवाला अर्पण करायचा 'नैवेद्य' असतो. शास्त्रानुसार हा सात्त्विक आहार असावा. मकर संक्रांतीला तामसिक अन्नाचा त्याग केला जातो. त्यामुळे खिचडीत लसूण किंवा कांदा वापरल्याने ती अपवित्र मानली जाते आणि ग्रहदोष लागू शकतो.
advertisement
4/7
तांदळाचा वापर: यंदा संक्रांतीच्या दिवशी षटतिला एकादशी आहे. एकादशीला तांदूळ खाणे किंवा दान करणे निषिद्ध मानले जाते. अशा वेळी तुम्ही तांदळाऐवजी वरीचे तांदूळ, साबुदाणा किंवा दलियाची खिचडी बनवू शकता. तांदळाची खिचडी केल्यास एकादशीचा दोष लागू शकतो.
advertisement
5/7
मांस आणि मद्य: मकर संक्रांत हा पवित्र काळ आहे. खिचडी बनवताना किंवा खाताना चुकूनही मांसाहार किंवा मद्याचा अंश नसावा. असे केल्याने शनिदेव आणि सूर्यदेव कोपित होतात, ज्यामुळे घरात दारिद्र्य येऊ शकते.
advertisement
6/7
जुनी किंवा शिळी डाळ: खिचडीसाठी नेहमी ताजी आणि स्वच्छ उडीद डाळ किंवा मुगाची डाळ वापरावी. घराच्या कोपऱ्यात पडलेली खूप जुनी किंवा कीड लागलेली डाळ खिचडीत वापरल्याने राहू आणि केतूचा दोष निर्माण होतो, जो कामात अडथळे आणतो.
advertisement
7/7
साधे मीठ: खिचडीमध्ये साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर करणे अधिक शुभ मानले जाते. सैंधव मीठ हे शुद्धतेचे प्रतीक आहे आणि ते चंद्राला प्रसन्न करण्यासाठी प्रभावी ठरते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
संक्रांती आणि एकादशीचा शुभ योग, पण आज 'ही' चूक करणं पडू शकत महागात; लागू शकतो दोष