TRENDING:

Amavasya: मौनी अमावस्येपासून 4 राशींची हालत बिकट; मोठा विश्वासघात-प्रॉपर्टीचा वाद उफाळणार, खराब वेळ

Last Updated:
Amavasya 2026 Horoscope: प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंधराव्या तिथीला अमावस्या येते. त्या-त्या अमावस्येचे वेगळे महत्त्व असते. अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तींचे वर्चस्व असते, असे मानले जाते. अमावस्येचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी लोक देवाची पूजा करतात. तर काही लोक नकारात्मक शक्तींचा वापर करून इतरांना हानी पोहोचवू शकतात. सध्या पौष महिना सुरू आहे. पौष अमावस्या रविवाी 18 जानेवारी रोजी आहे. या अमावस्येला मौनी अमावस्या असेही म्हणतात, या दिवशी स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व आहे. पौष अमावस्येच्या दिवशी 4 राशीच्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी. अशा लोकांच्या जीवनात मालमत्तेचे वाद, फसवणूक इत्यादीमुळे अशांतता येऊ शकते. माघ अमावास्येला कोणत्या राशींवर काय नकारात्मक परिणाम होऊ शकतात ते जाणून घेऊया.
advertisement
1/7
मौनी अमावस्येपासून 4 राशींची हालत बिकट; मोठा विश्वासघात-प्रॉपर्टीचा वाद उफाळणार
वृषभ : या वर्षीच्या पौष अमावस्येला वृषभ राशीच्या लोकांनी वडिलोपार्जित संपत्ती किंवा इतर संपत्तीबाबत काळजी घ्यावी लागेल. मालमत्तेच्या वादामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. यामुळे तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांचे कामाच्या ठिकाणी कोणाशी तरी वाद होण्याची शक्यता आहे.
advertisement
2/7
वृषभ - तुमचे काम गोपनीयपणे करा आणि तुमच्या बॉसच्या थेट संपर्कात रहा कारण इतर लोक तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात. तथापि, या दिवशी तुम्ही कोणत्याही वादात न पडण्याचा प्रयत्न करा.
advertisement
3/7
सिंह: अमावस्येच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांना मालमत्ता संबंधित समस्यांनी त्रास होऊ शकतो. या दिवशी कोणत्याही कागदावर सही करताना काळजी घ्यावी लागेल. तुम्ही ते नीट वाचून समजून घेतल्यावरच, त्यावर स्वाक्षरी करा किंवा तुमच्या वकिलाचा किंवा इतरांचा सल्ला घ्या. मालमत्तेच्या बाबतीत कोणी फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकतो.
advertisement
4/7
सिंह राशीच्या लोकांनी आपल्या योजना इतर कोणाशीही शेअर करू नयेत. इतरांच्या भांडणात पडण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. एखाद्या गोष्टीचा निर्णय घेण्यात गोंधळ होऊ शकतो.
advertisement
5/7
तूळ : अमावस्येच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांच्या मान-सन्मानाला धक्का बसू शकतो. दुसऱ्याच्या चुकीमुळे तुमच्यावर आरोप होऊ शकतात. काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या सहकाऱ्यांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. ज्यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते.
advertisement
6/7
तूळ - कामावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्याची जबाबदारी घेऊन टाका. तुमच्या उणिवा इतरांना सांगू नका आणि तुमच्या प्रामाणिकपणाचा दुरुपयोग करू नका. तुम्ही जितके कष्ट केले तितके परिणाम न मिळाल्यास तुम्ही नाराज व्हाल.
advertisement
7/7
मीन: अमावस्येचा दिवस मीन राशीच्या लोकांच्या लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवनासाठी चांगला आहे. या दिवशी तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. तुमच्या जोडीदाराच्या भावना दुखावतील असे काहीही बोलू नका किंवा वागू नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला सल्ला दिला जातो की सर्वकाही एकट्या नशिबावर सोडू नका. जर तुम्ही तुमचे कर्तव्य केले नाही तर नशीब तुम्हाला किती साथ देईल. नशिबासोबत कर्म असणंही महत्त्वाचं आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Amavasya: मौनी अमावस्येपासून 4 राशींची हालत बिकट; मोठा विश्वासघात-प्रॉपर्टीचा वाद उफाळणार, खराब वेळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल