Numerology: जन्मतारीख सांगू शकते तुम्हाला भविष्यात कोणते आजार होणार; मूलांक-आजारांचे कनेक्शन?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology For Birth Date: अंकशास्त्रानुसार, आपल्या जन्मतारखेवरून भविष्यात कोणाला कोणते आजार त्रास देऊ शकतात हे देखील कळू शकते. अंकशास्त्राच्या मदतीने आज आम्ही तुम्हाला जन्मतारखेनुसार अशा आजारांबद्दल सांगणार आहोत, जे भविष्यात तुम्हाला होण्याची शक्यता जास्त असेल.
advertisement
1/7

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९, २८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक १ असतो. या लोकांना उच्च रक्तदाब, संबंधित समस्या तसेच डोळ्यांच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
advertisement
2/7
कोणत्याही महिन्याच्या २, ११, २०, २९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक २ असतो, या लोकांना सर्दी, पोटाशी संबंधित समस्या तसेच प्रतिकारशक्ती कमी असण्याच्या त्रासांना तोंड द्यावे लागू शकते.
advertisement
3/7
अंकशास्त्रानुसार, ३, १२, २२, ३० तारखेला जन्मलेल्या लोकांना भविष्यात धुळीची ऍलर्जी, मूत्रमार्गाचा संसर्ग, वजन वाढणे आणि फुफ्फुसांशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
advertisement
4/7
४, १३, २२, ३१ तारखेला जन्मलेल्या लोकांना भविष्यात डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास, घशाचा संसर्ग, मायग्रेन आणि केस गळणे यासारख्या समस्या येऊ शकतात.
advertisement
5/7
कोणत्याही महिन्याच्या ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींना भविष्यात घशात दुखणे, विषारी पदार्थांचे प्रमाण वाढणे आणि पचनाच्या समस्या येऊ शकतात.
advertisement
6/7
कोणत्याही महिन्याच्या ६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींना भविष्यात लैंगिक समस्या, मासिक पाळीच्या समस्या, प्रजनन समस्या तसेच त्वचेच्या समस्या येऊ शकतात.
advertisement
7/7
कोणत्याही महिन्याच्या ७, १६, २५ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींना चिंता, नर्व्हस ब्रेकडाउन आणि पाय दुखणे यासारख्या समस्या येऊ शकतात. ८, १७, २६ तारखेला जन्मलेल्या व्यक्तीला सांधेदुखी, संधिवात, स्नायूंच्या समस्या आणि डोकेदुखी यासारख्या समस्या येऊ शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Numerology: जन्मतारीख सांगू शकते तुम्हाला भविष्यात कोणते आजार होणार; मूलांक-आजारांचे कनेक्शन?