TRENDING:

रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता? ज्योतिषांनी दिली महत्त्वाची माहिती

Last Updated:
Raksha Bandhan 2023 : रक्षा बंधनाचा शुभ मुहूर्त कोणता? राखी बांधताना कोणत्या चुका टाळाव्यात? जाणून घ्या..
advertisement
1/7
रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता? ज्योतिषांनी दिली महत्त्वाची माहिती
<a href="https://news18marathi.com/tag/rakshabandhan/">रक्षाबंधन</a> हा बहीण भावांच्या पवित्र नात्याचा सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दिर्घ आयुष्य आणि सुखाची प्रार्थना करते. 2023 म्हणजेच यंदा रक्षाबंधन काही दिवसांवर आले आहे.
advertisement
2/7
राखी नेमकी 30 तारखेला बांधायची की 31 तारखेला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रक्षाबंधनाच्या पवित्र क्षणाचा शुभ मुहूर्त काय आहे? भावाला राखी बांधताना कोणत्या चुका टाळाव्यात? याबाबत <a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/">वर्धा</a> येथील ज्योतिष अभ्यासक पद्माकर पेठकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
advertisement
3/7
यावर्षी 30 तारखेला सकाळी दहा ते ते रात्री नऊ वाजेपर्यंत भद्रा नक्षत्राचा काळ असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या काळामध्ये राखी बांधणं अशुभ मानलं जातं. त्यामागंही काही कारण गुरुजी सांगतात. 31 तारखेला सकाळी 5 : 45 वाजलेपासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत आपण हा सण साजरा करू शकतो. म्हणजे तुम्ही भावाला राखी बांधू शकता, असे पेठकर गुरुजी सांगतात.
advertisement
4/7
भद्र काळात अशुभ काळ मानला जातो. रावणाची बहीण शुर्पनखा हिने भद्रा चालू असताना भाऊ रावणाला राखी बांधली. त्यामुळे त्यांच्या कुळाचा नाश झाला. म्हणून हा काळ भद्र मानला जातो. भद्रा ही सूर्याची कन्या आणि शनि देवाची बहीण भद्र असल्याने तिला अशूभ मानतात, असे पेठकर गुरूजींनी सांगितले.
advertisement
5/7
रक्षाबंधनाच्या दिवशी बांधली जाणारी राखी पूर्ण प्लास्टिकची नसावी. तुटलेली किंवा खंडीत नसावी. काळ्या रंगाच्या धाग्यात नसावी. त्यावर अशुभ चिन्ह नसावे. मनगटाच्या वर खूप मोठी राखी नसावी. भद्रकाळात राखी बांधू नये. तसेच बहीण भावांनी काळे कपडे परिधान करू नये, असे पेठकर गुरुजी सांगतात.
advertisement
6/7
सोबतच भेट देताना काचेची किंवा तुटलेली वस्तू, काळे कपडे देऊ नये असे पेठकर गुरुजी सांगतात.
advertisement
7/7
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता? ज्योतिषांनी दिली महत्त्वाची माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल