TRENDING:

पगारवाढीचा दिवस! 'ही' असेल तुमची रास, तर मिळू शकतं प्रमोशन, फक्त बायकोचं मन मात्र जपा

Last Updated:
29 जानेवारी अर्थात आजचा दिवस. मौनी अमावस्येचा हा दिवस काही राशींच्या व्यक्तींसाठी आनंदाने अगदी भरलेला असेल. एका राशीच्या व्यक्तींसाठी तर हा दिवस पगारवाढीचा असण्याची शक्यता आहे. ज्योतिषांनी याबाबत काय सांगितलंय, जाणून घेऊया. (मोहित शर्मा, प्रतिनिधी / करौली)
advertisement
1/5
पगारवाढीचा दिवस! 'ही' असेल रास, तर मिळू शकतं प्रमोशन, फक्त बायकोचं मन मात्र जपा
ज्या राशीच्या व्यक्तींबाबत ज्योतिषांनी ही माहिती दिली आहे, त्यांनी आज जर गुंतवणूक केली तर त्यातून भविष्यात उत्तम नफा मिळू शकेल. खरंतर आर्थिकदृष्ट्या हा पूर्ण दिवस सकारात्मक असणार आहे.
advertisement
2/5
राजस्थानच्या कोटा भागातील प्रसिद्ध ज्योतिषी कविता जांगिड यांनी मकर राशीच्या व्यक्तींसाठी ही सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, या राशीच्या ज्या व्यक्ती नोकरी करत असतील, त्यांची अचानक पगारवाढ होऊ शकते किंवा प्रमोशन होण्याचाही योग आहे.
advertisement
3/5
मकर राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला असला तरी आज आपल्या संसाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. जोडीदारासोबत खटके उडू शकतात. त्यामुळे आनंदात जरा मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याकडून वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
advertisement
4/5
जोडीदारासोबतच नाही, तर एकंदरीतच मकर राशीच्या व्यक्तींनी आज कोणत्याही वादात पडू नये. विचारपूर्वक बोलावं आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावे, नाहीतर लहान लहान गोष्टींवरून अगदी टोकाचे वाद होण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
पगारवाढीचा दिवस! 'ही' असेल तुमची रास, तर मिळू शकतं प्रमोशन, फक्त बायकोचं मन मात्र जपा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल