TRENDING:

शनीने बदलली रास, आता घडणार चमत्कार, एप्रिलमध्ये 4 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार मोठा धमाका!

Last Updated:
ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रहांना विशिष्ट महत्त्व आहे. शनीला म्हणतात 'न्यायदेवता'. कारण हा ग्रह प्रत्येक व्यक्तीच्या पाप-पुण्याचा हिशेब करून त्यानुसार चांगलं, वाईट फळ देतो. महत्त्वाचं म्हणजे शनी ग्रहाची चाल सर्वात हळूवार असते, परंतु प्रभाव मात्र तेवढाच प्रबळ असतो. शनी तब्बल अडीच वर्षांनी रास बदलतो, त्यामुळे त्याचा सर्व 12 राशींवर होणारा प्रभावही तेवढाच परिणामकारक असतो, असं ज्योतिषी सांगतात. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
1/7
शनीने बदलली रास, घडणार चमत्कार, एप्रिलमध्ये 4 राशींच्या आयुष्यात होणार धमाका!
29 मार्च हा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत खास ठरला. याच दिवशी सूर्यग्रहण लागलं आणि शनी ग्रहाचा कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश झाला. त्यातून काही राशींच्या व्यक्तींच्या वाट्याला भरभरून सुख आलंय. परंतु आता लवकरच शनी उदय होणार आहे. त्यातून तर काही राशींच्या व्यक्तींचं नशीब अगदी चांदणीसारखं चमकेल, असं ज्योतिषांनी सांगितलं आहे. त्यामुळे या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत, जाणून घेऊया.
advertisement
2/7
मीन : शनी उदय होण्याचा सकारात्मक प्रभाव या राशीच्या व्यक्तींवर पडेल. त्यांची शनी ढैय्या संपली आहे. आता आर्थिक स्थिती सुधारेल. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. अपूर्ण कामं पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असाल तर आता मनासारखी संधी मिळेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील.
advertisement
3/7
तूळ : शनी उदय होताच या राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक काळ सुरू होईल. शनीच्या कृपेनं एकाग्रता वाढेल. आयुष्यात ज्या काही अडचणी असतील त्या हळूहळू संपतील. मानसिक आरोग्यही उत्तम राहील.
advertisement
4/7
वृश्चिक : या राशीच्या व्यक्तींवर शनी उदयाचा सकारात्मक प्रभाव पडेल. आर्थिक स्थिती सुधारेल. या काळात केलेल्या गुंतवणुकीतून भविष्यात उत्तम नफा मिळेल. कुटुंबात ज्या काही समस्या सुरू असतील त्या संपतील. आई-बाबा होऊ इच्छिणाऱ्या दाम्पत्याला आता गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
मकर : शनी ग्रहाचा उदय होताच या राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास कमालीचा वाढेल. जमीन, घर, वाहन खरेदीचा योग आहे. आपल्या कामानं समाजात मान-सन्मान वाढेल. संवाद कौशल्यही सुधारेल, ज्यामुळे प्रगती होईल.
advertisement
6/7
देवघरमधील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, शनीचा अस्त अवस्थेत कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश झाला आहे. आता येत्या 6 एप्रिलला मीन राशीतच शनीचा उदय होईल. त्यातून वरील 4 राशींच्या व्यक्तींच्या वाट्याला भरभरून सुख येईल.
advertisement
7/7
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
शनीने बदलली रास, आता घडणार चमत्कार, एप्रिलमध्ये 4 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार मोठा धमाका!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल