TRENDING:

शनी वक्र झाला की, नशीब सरळ झालं समजायचं! 3 राशींना गुड न्यूज मिळण्याची शक्यता

Last Updated:
ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मफळ देवता मानलं जातं. म्हणजेच शनी आपल्याला आपल्या चांगल्या, वाईट कर्माचं चांगलं वाईट फळ देत असतो. त्यामुळे त्याची प्रत्येक चाल, प्रत्येक स्थिती सर्व 12 राशींसाठी महत्त्वाची असते. ज्या राशीला शनीचा आशीर्वाद मिळतो, त्या राशीच्या व्यक्तीचं नशीब अगदी रातोरात बदलायला वेळ लागत नाही, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. आता पुढच्या महिन्यात शनीची स्थिती बदलणार आहे. त्यामुळे त्याचा काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडेल हे निश्चित. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
1/5
शनी वक्र झाला की, नशीब सरळ झालं समजायचं! 3 राशींना गुड न्यूज मिळण्याची शक्यता
<a href="https://news18marathi.com/tag/shani/">शनी</a> सध्या आपल्या स्वराशीत म्हणजे कुंभ राशीत विराजमान आहे. मूळातच शनी हा सर्वात धीम्या चालीचा ग्रह मानला जातो. त्यामुळे पुढच्या वर्षापर्यंत म्हणजे 2025पर्यंत तो या राशीतून काही बाहेर पडणार नाही. परंतु त्याची स्थिती मात्र नक्की बदलेल. येत्या 30 जूनला शनी याच राशीत वक्र होईल. तेव्हा त्याची कुदृष्टीही कृपेत बदलेल. ज्या ज्या राशींना त्याचा आशीर्वाद मिळेल, त्यांचे चांगले दिवस त्याच क्षणापासून सुरू होतील. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, पाहूया. झारखंडमधील देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी याबाबत माहिती दिलीये.
advertisement
2/5
कर्क : आपल्यावर शनीची कृपा आहे. त्यामुळे या ग्रहाची चाल बदलताच आपलं नशीब लख्ख उजळेल. एवढी भरभराट होईल की, आपल्यासाठी जणू मातीतूनही सोनं निघेल. हाती घ्याल त्या प्रत्येक कामात यश मिळेल. करियरमध्ये नशीब साथ देईल. व्यवसायात आर्थिक नफा होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम आहे.
advertisement
3/5
वृश्चिक : आपल्यावरही शनीच्या चालबदलाचा सकारात्मक प्रभाव पडेल. नवविवाहित दाम्पत्याला नव्या पाहुण्याची चाहूल लागू शकते. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त अशी स्थिती असल्यामुळे बचत चांगली होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. शिवाय कामामुळे आपला मान-सन्मान वाढेल. व्यापार विस्तारेल. जोडीदारासोबत उत्तम प्रवास होईल. आपल्यावर जणू पैशांचा पाऊस पडेल.
advertisement
4/5
मीन : शनी वक्र झाला की आपलं <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/june-2024-is-extremely-beneficial-for-six-zodiac-signs-l18w-mhij-1187266.html">नशीब</a> सरळ झालं म्हणून समजायचं. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. वेळोवेळी आपल्याला आर्थिक <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/change-the-direction-of-the-plants-if-you-have-even-1-of-these-7-l18w-mhij-1186763.html">लाभ</a> होईल. सर्वबाबतीत मनासारख्या गोष्टी घडतील. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. लग्न करायचं असेल तर आता एक उत्तम स्थळ येण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी कळेल. नोकरी मिळण्याचाही योग आहे.
advertisement
5/5
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
शनी वक्र झाला की, नशीब सरळ झालं समजायचं! 3 राशींना गुड न्यूज मिळण्याची शक्यता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल