TRENDING:

स्फटिक माळ धारण करण्याचा करताय विचार? आधी जाणून घ्या 'हे' महत्त्वाचे नियम आणि त्याचे परिणाम!

Last Updated:
ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्मात 'स्फटिक' या रत्नाला अत्यंत पवित्र आणि प्रभावी मानले जाते. स्फटिक हे नैसर्गिक रत्न असून ते दिसायला काचेसारखे पारदर्शक आणि थंड असते. स्फटिकाची माळ केवळ सौंदर्यासाठी नाही, तर मानसिक शांती आणि आर्थिक समृद्धीसाठी देखील वापरली जाते.
advertisement
1/7
स्फटिक माळ धारण करण्याचा करताय विचार? जाणून घ्या 'हे' महत्त्वाचे नियम आणि परिणाम
ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्मात 'स्फटिक' या रत्नाला अत्यंत पवित्र आणि प्रभावी मानले जाते. स्फटिक हे नैसर्गिक रत्न असून ते दिसायला काचेसारखे पारदर्शक आणि थंड असते. स्फटिकाची माळ केवळ सौंदर्यासाठी नाही, तर मानसिक शांती आणि आर्थिक समृद्धीसाठी देखील वापरली जाते. मात्र, ही माळ धारण करण्यापूर्वी तिचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा त्याचे पूर्ण फळ मिळत नाही.
advertisement
2/7
शुद्धीकरण: बाजारातून आणलेली माळ थेट गळ्यात घालू नका. ती आधी शुद्ध करणे आवश्यक आहे. माळ घालण्यापूर्वी ती थोडा वेळ कच्चे दूध आणि गंगाजलाने स्वच्छ करा. त्यानंतर ती देवासमोर ठेवून तिची पूजा करा.
advertisement
3/7
योग्य दिवस आणि मुहूर्त: स्फटिक माळ धारण करण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. शुक्रवारी सकाळी अंघोळ केल्यानंतर उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून माता लक्ष्मीचे स्मरण करत ही माळ धारण करावी.
advertisement
4/7
मंत्र जप: माळ धारण करताना 'ॐ द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम:' किंवा 'ॐ श्रीं महालक्ष्म्यै नम:' या मंत्राचा 108 वेळा जप करणे अत्यंत फलदायी ठरते. यामुळे माळेतील ऊर्जा सक्रिय होते.
advertisement
5/7
केवळ स्वतःसाठी वापरा: तुमची स्फटिक माळ कधीही दुसऱ्याला घालण्यासाठी देऊ नका किंवा दुसऱ्याची माळ स्वतः वापरू नका. प्रत्येकाची ऊर्जा वेगळी असते, त्यामुळे दुसऱ्याची माळ वापरल्याने नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
advertisement
6/7
झोपताना काळजी: स्फटिक माळ वापरताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. काही विद्वानांच्या मते, रात्री झोपताना ही माळ काढून स्वच्छ जागी किंवा देवापाशी ठेवावी आणि सकाळी पुन्हा धारण करावी. यामुळे माळेची शुद्धता टिकून राहते.
advertisement
7/7
अशौच काळात वर्ज्य: सुतक किंवा घरातील कोणाच्या निधनानंतर ही माळ शरीरापासून दूर ठेवावी. तसेच शारीरिक संबंधांच्या वेळी देखील ही माळ न घालण्याचा सल्ला दिला जातो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
स्फटिक माळ धारण करण्याचा करताय विचार? आधी जाणून घ्या 'हे' महत्त्वाचे नियम आणि त्याचे परिणाम!
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल