TRENDING:

Ram Navami: जिथं प्रभू रामाचं वास्तव्य, तिथंच तब्बल 70 फुटाची मूर्ती, डोळ्यांचं पारणं फेडणारे Photos

Last Updated:
Ram Navami 2025: प्रभू रामचंद्र वनवासात असताना नाशिक पंचवटी परिसरात त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य असल्याचं सांगितलं जातं. इथंच 70 फूट उंचीची रामाची मूर्ती बनवण्यात आलीये.
advertisement
1/7
जिथं रामाचं वास्तव्य, तिथं तब्बल 70 फुटाची मूर्ती, डोळ्यांचं पारणं फेडणारे Photo
संपूर्ण भारतभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अयोध्येनंतर हा उत्सव महाराष्ट्रातील नाशिक येथे मोठ्या जल्लोषात साजरा होतो.
advertisement
2/7
प्रभू रामचंद्र हे माता सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्यासह वनवासात असताना नाशिक, पंचवटी परिसरात दीर्घकाळ वास्तव्यास होते, असे सांगितले जाते. त्यामुळे हे ठिकाण हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान आहे.
advertisement
3/7
जिथं प्रभू रामाचं वास्तव्य होतं, त्याच पंचवटी परिसरात श्रीरामाची तब्बल 70 फुटांची मूर्ती आहे. त्यामुळे देश-विदेशातून पर्यटक आणि भाविक देखील याठिकाणी येत असतात.
advertisement
4/7
प्रभू रामाची मूर्ती पंचवटीपासून जवळच तपोवन दंडकारण्य परिसरात आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती उभ्या स्वरुपात असून हाती धनुष्य घेतलेला आहे.
advertisement
5/7
नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या संकल्पनेतून ही भव्यदिव्य मूर्ती साकारण्यात आलीये. सन 2024 मध्ये या मूर्तीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला होता.
advertisement
6/7
नाशिक महापालिकेनं जवाहरलाल नेहरु पुनरुत्थान योजनेतंर्गत तपोवनामध्ये 5 एकर जागेत रामसृष्टी उद्यान निर्माण केलं आहे. याच रामसृष्टीमध्ये श्रीरामाचं हे देखणं शिल्प उभारण्यात आलं आहे.
advertisement
7/7
तपोवन परिसरात गोदा-कपिला संगम, श्रीराम-सीता मातेची झोपडी, शूर्पनखेचे नाक कापल्याच्या अख्यायिकेचे स्थळ, राम-लक्ष्मणाचं मंदिर अशी कितीतरी शक्तीस्थळे असून ती भाविकांप्रमाणेच पर्यटकांना देखील खेचून आणतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
Ram Navami: जिथं प्रभू रामाचं वास्तव्य, तिथंच तब्बल 70 फुटाची मूर्ती, डोळ्यांचं पारणं फेडणारे Photos
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल