'या' राशीच्या व्यक्तींसाठी काळ अडचणींचा! जपून करावा प्रवास, आरोग्य बिघडण्याची शक्यता
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Astrology: प्रत्येक दिवस हा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असतो, येणारी वेळ आपल्यासाठी काय घेऊन येईल हे आपल्या कर्मांवर अवलंबून असतंच, शिवाय त्यात आपल्या पत्रिकेतील ग्रह-ताऱ्यांची स्थितीही महत्त्वाची भूमिका बजावते, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. त्यानुसार एका राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अडचणी घेऊन आला आहे. (अभिषेक जयस्वाल, प्रतिनिधी / वाराणसी)
advertisement
1/5

आज 28 जानेवारी. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस करियरबाबत अतिशय फायद्याचा आहे. नवीन संधी मिळतील, त्यामुळे मन प्रसन्न राहील, फक्त काही बाबतीत काळजी घ्यायला हवी.
advertisement
2/5
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज लांबचा प्रवास टाळावा. कारण प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. तसंच आरोग्यही बिघडू शकतं, त्याबाबत काळजी घ्यावी.
advertisement
3/5
वृषभ राशीच्या व्यक्तींच्या प्रेमातही अडथळे येण्याची शक्यता आहे. रिलेशनशिपमध्ये काही अडचणी येऊ शकतात. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात. त्यामुळे आज आपलं नातं जपण्याचा प्रयत्न करावा.
advertisement
4/5
पंडित संजय उपाध्याय यांनी ही सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलं की, वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चढ-उताराचा असेल. शब्द जपून वापरावे. कुटुंबात प्रेमाने गोष्टी हाताळाव्या, नात्यांमध्ये कडवटपणा येणार नाही याची काळजी घ्यावी.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
'या' राशीच्या व्यक्तींसाठी काळ अडचणींचा! जपून करावा प्रवास, आरोग्य बिघडण्याची शक्यता