TRENDING:

'या' मंदिरात भाविक जाळतात चक्क चांदीची अंगठी! अशा परंपरेमागे नेमकं कारण तरी काय?

Last Updated:
संपूर्ण देशात आता थंडीला सुरुवात झाली आहे. सर्वसामान्यपणे आपण थंडीत शरिराला उब मिळावी यासाठी गरम कपडे वापरतो. गरम पदार्थही खातो. परंतु तुम्हाला माहितीये का, अनेक ठिकाणी देवाचंही थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यालादेखील उबदार कपडे घातले जातात. इतकंच नाही तर, गरम पदार्थांचा नैवेद्यही देवाला दाखवला जातो.
advertisement
1/5
'या' मंदिरात भाविक जाळतात चक्क चांदीची अंगठी! नेमकं कारण तरी काय?
अनेक ठिकाणचा पारा आता घसरलाय. त्यामुळे सर्वत्र लोक स्वेटर आणि कानटोपीत पाहायला मिळतात. शिवाय रात्रीच्या वेळी शेकोटीदेखील पेटवली जाते. उत्तर प्रदेशच्या वृंदावनात मंदिरांमध्ये देवाचं थंडीपासून संरक्षण करण्यासाठी भाविकांकडून विविध उपाय केले जात आहेत.
advertisement
2/5
श्री राधावल्लभ मंदिरात देवाला थंडी लागू नये यासाठी चांदीची अंगठी जाळून देवाच्या अवतीभोवती उब निर्माण केली जातेय. शिवाय गरम पदार्थांचं नैवेद्यही देवाला दाखवलं जातंय.
advertisement
3/5
देवाला आकर्षक उबदार कपडेही घातले आहेत. इतकंच नाही, तर हातात आणि पायात मौजेदेखील घालण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कडाक्याची थंडी असली तरी इथं दररोज दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते.
advertisement
4/5
श्री राधावल्लभ मंदिर वृंदावनच्या बाँकेबिहारी मंदिराजवळच आहे. इथले पुजारी मोहित मराल गोस्वामी यांनी सांगितलं की, मंदिरात देवाचा शीतकालीन उत्सव साजरा होतोय. या उत्सवातच देवाचं थंडीपासून संरक्षण करण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. तर नैवेद्यात गोड खिचडी, केशर खिचडी, फिकी खिचडी, मेवा खिचडी असे विविध पदार्थ देवाला अर्पण केले जातात.
advertisement
5/5
इथं दरवर्षी हिवाळ्यात चांदीची अंगठी जाळली जाते. काही दिवस ही परंपरा पाळली जाते. यात भाविक आनंदाने सहभागी होतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
'या' मंदिरात भाविक जाळतात चक्क चांदीची अंगठी! अशा परंपरेमागे नेमकं कारण तरी काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल