TRENDING:

तुमच्या जोडीदाराच्या दातांचा आकार कसा? त्यावरून कळतो खरा स्वभाव आणि बरंच काही...

Last Updated:
Astrology: सामुद्रिक शास्त्र हा ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्याची ठेवण, शरीरावरील खुणांवरून तिच्या स्वभावाबाबत, भविष्याबाबत अनेक गोष्टी उलगडतात, असं यात सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे व्यक्तीचे दातही खूप काही दर्शवतात, असं सामुद्रिक शास्त्र सांगतं.
advertisement
1/5
तुमच्या जोडीदाराच्या दातांचा आकार कसा? त्यावरून कळतो खरा स्वभाव आणि बरंच काही...
दातांमध्ये फट असणारे लोक आपले विचार आणि समजूतदारपणासाठी विशेष ओळखले जातात. त्यांना खूप भाग्यवान मानलं जातं. प्रत्येक काम पूर्ण करण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात असतो. तसंच ते जे काम हातात घेतात त्यात यशस्वी होतात. ते समाजात लोकप्रिय असतात. तसंच दुसऱ्यांना योग्य सल्ला देण्यासाठीही सक्षम असतात. त्यांचा सल्ला मानणारे लोकदेखील फायद्यात राहतात, असं सामुद्रिक शास्त्रात सांगितलं आहे.
advertisement
2/5
ज्या लोकांचे दात पांढरे चकचकीत आणि सुंदर असतात तेदेखील भाग्यवान मानले जातात. इतरांप्रति त्यांचा स्वभाव अतिशय चांगला असतो. ते सर्वांसोबत मिळून-मिसळून राहतात. तसंच हे लोक कलाप्रेमी असतात.
advertisement
3/5
ज्या लोकांचे दात लहान असतात ते मतलबी आणि लालची मानले जातात. त्यांना फिरायला खूप आवडतं. व्यवसायात खूप यश मिळतं आणि असे लोक आनंदी आयुष्य जगतात.
advertisement
4/5
सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या लोकांचे दात रुंदीने मोठे असतात ते निडर मानले जातात. हे लोक अजिबात कशालाही आणि कोणालाही घाबरत नाहीत.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
तुमच्या जोडीदाराच्या दातांचा आकार कसा? त्यावरून कळतो खरा स्वभाव आणि बरंच काही...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल